प्रतिष्ठा न्यूज

येळावी येथील सौ.धनश्री अतुल माने यांना PhD पदवी प्रदान; मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : येळावी ता.तासगाव जि.सांगली येथील माजी मुख्याध्यापक जालिंदर माने(सर) यांच्या सूनबाई सौ.धनश्री अतुल माने यांना डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे येथे ” Hybrid Approach for Efficient Vineyard Yield Prediction System using Artificial Intelligence ” या विषयावरती सखोल संशोधन केल्याबद्दल त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रामधील PhD पदवी प्रदान करण्यात आली . त्यांनी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या वूमन सायंटिस्ट -B योजनेअंतर्गत तीस लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळवली होती.
त्यांना या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांचे वडील डॉ.के.न.बारबोले डायरेक्टर जेएसपीएम इन्स्टिट्यूट पुणे आणि PhD गाईड डॉ.पारुल जाधव मॅडम यांनी सखोल मार्गदर्शन केले.
त्यांचा पुणे येथे प्रा. डॉ. तानाजीराव सावंत सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य आणि MIT संस्थेचे व्हाईस चान्सलर डॉ. रवी कुमार चिटणीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यांचे गुरुकुल अभ्यासिका व ग्रंथालय, माने परिवार आणि समस्त येळावी ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन.

 

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.