प्रतिष्ठा न्यूज

ए बी पाटील इंग्लीश स्कुलच्या सीबीएसई, 10 वीची १००% निकालाची २२ वर्षांची परंपरा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : श्री आदगोंडा बाबगोंडा पाटील ट्रस्ट संचलित श्री ए बी पाटील इंग्लीश स्कुलच्या सीबीएसई, 10 वी मधील उज्वल यशाची १००% निकालाची परंपरा सलग २२ व्या वर्षी ही अबाधित ठेवत शाळेचे टॉपर विद्यार्थी
1) सोहम महेश पाटील ९६.६०%
२) ऋत्विक मनोळी ९५.४०%
३) कु. प्रगती ज्ञानोबा कोळेकर ९४.४०%
यांनी प्रिन्सिपल सुरज पवार सर व अकॅडमीक को ॲार्डिनेटर मंजुश्री काळे व विषय शिक्षक यांच्या मार्गदर्शनात या उज्वल यशाचा कळस याही वर्षी गाठला.
या वेळी संस्थापक श्री. सुरेशजी पाटील , चेअरमन सौ जयश्री पाटील व ट्रस्टी प्रिया पाटील यांनी विद्यार्थ्याच्या यशाबद्दल सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक व इतर कर्मचारी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावर्षी अनेक मुलांनी जिल्हा,राज्य व देश स्तरावर केलेली क्रिडा, संगीत व विविध उपक्रमातील कामगीरी ही वाखाणण्याजोगी आहे तसेच ॲस्ट्रोनॅामी, रोबोटिक्स, व्हिडीओ एडिटींग या नवीन अभिनव उपक्रमांची सुरवात या वर्षी केली आहे. मुलांच्या भविष्यासाठी, मुलांमधील शैक्षणिक गुणवत्ता जागतिक दर्जाची व्हावी या साठी शाळेकडे अद्ययावत इमारत व क्रीडांगण उपलब्ध आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.