प्रतिष्ठा न्यूज

कौतुकपासून दुर्लक्षित राहिलेली सावळज येथील अंध विद्यार्थिनी समीक्षा माळी हिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज : सावळज (माळीनगर) येथील अंध विद्यार्थिनी कु.समीक्षा अनिल माळी हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून अडचणींवर मात करीत जिद्द व चिकाटीच्या जोरावर एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत 73 टक्के मार्क मिळवून उज्वल असे यश संपादन केले.
दृष्टीहीन असलेल्या समीक्षाची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असून तिच्या पालकांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये तिच्या शिक्षणासाठी खूपच मोलाची साथ दिली आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे नेत्र दीपक कामगिरी करणारी समीक्षा सत्कार व कौतुकापासून वंचितच राहिली आहे. लहानपणापासूनच 90% अंधत्व आणि आणि त्यात घरची आर्थिक परिस्थिती बेताची असून सुध्दा जिद्द चिकाटी, व मेहनतीच्या जोरावर समीक्षा ज्ञान मंदिराच्या पायऱ्या चढली आहे.
खरे तर अंध विद्यार्थी ब्रेन लिपीच्या माध्यमातून शिक्षण घेत असतात परंतु सावळज सारख्या ग्रामीण भागात दिव्यांगांची शाळा नसल्याने समीक्षाने सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे स्थानिक शाळेतूनच शिक्षण घेतले आहे, तिने 500 पैकी 365 मार्क्स मिळविले आहेत.
कौतुकापासून दुर्लक्षित राहिलेल्या समीक्षाचे सध्या सर्वच स्थरातून कौतुक होत आहे तसेच तिच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिच्या पुढील शिक्षणासाठी सर्वांनी सढळ हाताने मदतीचा हात द्यावा अशी मागणी सर्वच स्थरातून होत आहे.

यावेळी सावळज येथील जेष्ठ पत्रकार रमेश मस्के, प्रहार अपंग सेवाभावी संस्थेचे राहुल कलाल, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत केदार, सावळज ग्रामपंचायत सदस्य नागेश सुतार, गजानन शिंदे, आदी मान्यवरांच्या हस्ते समीक्षाचा सत्कार करण्यात आला व पुढील शिक्षणासाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.