प्रतिष्ठा न्यूज

भारतीय संविधान हा मानवतावादी जीवन मूल्यांची जोपासना करणारा सर्वोच्च राष्ट्रीय ग्रंथ : डाॅ. बाबुराव गुरव

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता यास प्राधान्य देवून सामाजिक समतेवर आधारीत मानवतावादी जीवन मूल्यांची जोपासना करणारा सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान होय असे उदगार ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डाॅ. बाबुराव गुरव यांनी प्रतिपादन केले. तासगाव येथील नामांकित अशा पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आयोजित भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान : एक चिंतन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे कुशल प्रशासक मा
डाॅ. मिलींद हुजरे यांनी अध्यक्ष स्थान भूषविले त्यांनी आपल्या मनोगतात भारतीय संविधानाच्या मौलीक तत्त्वांची माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. डी. वाय. साखरे यांनी केले. यावेळी कु. प्रांजली जाधव हिने संविधानाच्या उद्देशपत्रीकेचे सामुहिक वाचन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डाॅ. अर्जुन वाघ यांनी केला तर आभार उपप्राचार्य प्रा. जालिंदर यादव यांनी मानले. या कार्यक्रमास ज्युनियर विभाग प्रमुख प्रा. राजेश रोमन, प्रा. एस. डी. पाटील, डाॅ. शहाजी पाटील, प्रा. अनिल पाटील, डाॅ. अमोल सोनवले, प्रा. साईनाथ घोगरे, डाॅ. पवनकुमार तेली, प्रा. सुनील गावीत, प्रा. पल्लवी मिरजकर, प्रा. सुरेखा पाटील, डाॅ. आंदेलवार डाॅ. मगदूम मॅडम, प्रा. नेहा मोरे कुलदीप पाटील, प्रा. विशाल पाटील, डाॅ. अमित माळी, कार्यालयीन अधीक्षक श्री एम. बी. कदम तसेच या कार्यक्रमास महाविद्यालयातील गुरूदेव कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.