प्रतिष्ठा न्यूज

ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेची गगनबावडा शाखा स्थापनेबाबत बैठक

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा ता.२६ : भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायत समितीचे संस्थापक व थोर स्वातंत्र्य सेनानी ग्राहक तीर्थ स्वर्गीय बिंदू माधव जोशी स्थापीत आणि शासनमान्य असलेल्या’ ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ या संस्थेची गगनबावडा तालुका शाखा स्थापन करण्यासंदर्भात दुसरी बैठक शुक्रवारी पंतअमात्य जहागीरदार यांच्या पळसंबे येथील ऐतिहासिक परिसरात आयोजित करण्यात आली होती.
प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख सांगशी- सैतवडे चे सरपंच भास्कर माने यांनी केले.त्यांनी प्रमुख पाहुणे प्रा. एस एन पाटील यांची या चळवळीतील तळमळआणि महान कार्याची, योगदानाची दखल घेऊन त्यांच्या तालुका अध्यक्ष ते राज्य सदस्य पर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. हे कार्य करत असताना त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तरीही अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची वृत्ती असामान्य आहे. असे ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे प्राध्यापक एस एम पाटील म्हणाले, ” ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा असून आज ग्राहकाची अनेक प्रकारे फसवणूक, अडवणूक होत आहे. ग्राहकांचे संघटन, ग्राहकांचे प्रबोधन आणि ग्राहकाना योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. संवाद, समन्वयात ग्राहक कल्याण महत्त्वाचे असते. वस्तू आणि सेवा खरेदी करणारे प्रत्येक व्यक्ती ग्राहक आहे. ग्राहकाच्या हक्क आणि अधिकारासाठी कार्य करणारे ग्राहक पंचायत महाराष्ट्र एक अग्रगण्य संस्था आहे. यावेळी त्यांनी ग्राहकांची फसवणूक की कशी होते याबाबत अनेक उदाहरणे सांगितली. त्यातून समन्वय कसा साधावा. प्रश्न कसे सोडवावेत याबाबतही त्यांनी विवेचन केले.
राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम घेतले जात नाहीत याची खंत त्यांनी बोलून दाखवली. तुम्ही ‘ गिर्‍हाईक बनू नका तर ग्राहक बना. सजग ग्राहक बना. यासाठी संघटित व्हा, संस्थेचे सभासद व्हा. असे तळमळीचे आव्हान त्यांनी सर्वांना केले. ”
यावेळी भास्कर माने,विलास पाटील, टी एच पडवळ, कुंडलिक जाधव,सरदार पाटील, सुरेश केसरकर, संतोष येडगे, जयसिंग गायकवाड, परेश भारती, बारकू केसरकर, सखाराम गावकर,कृष्णात यादव आदी तालुक्यातील ४६ वाड्या वस्त्यातून आलेले शंभर वर कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.