प्रतिष्ठा न्यूज

तासगावचा श्रींचा 243वा रथोत्सव मोरयाच्या गजरात संपन्न : पहिल्यांदाच “दिवाणजी खोबरं”चा जयघोष नाही

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगावचा ऐतिहासिक 243वा श्रींचा रथोत्सव *मोरया* च्या गजरात आज संपन्न झाला.विश्वस्त श्री राजेंद्र पटवर्धन,आणि विश्वस्त डॉ आदिती पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक रथोत्सवास दुपारी 1.45 वाजता प्रारंभ झाला.गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया च्या गजरात भाविकांनी ऐतिहासिक रथोत्सव पार पाडला.मात्र यावेळच्या रथोत्सवात *दिवाणजी खोबरं* चा जयघोष भाविकांकडून झाला नाही.याऐवजी *ताई पेढे आणि ताई खोबरं* अशा घोषणा भाविकांनी दिल्या.श्री गणपती मंदिरापासून श्री काशिविश्‍वेश्‍वर मंदिरा पर्यंत रथ नेण्यात आला.त्यानंतर तेथे श्री गणपतीची आरती करण्यात आली.आरती झाल्यानंतर दीड दिवसाच्या मुर्तीचे कापूर ओढ्यात विसर्जन करण्यात आले.विसर्जनानंतर पंचधातूंच्या मुर्तीसह रथ पुन्हा गणपती मंदीराकडे आणण्यात आला. रथ उत्सवासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.विश्वस्त डॉ.आदिती पटवर्धन यांनी रथोत्सव व्यवस्थितपने पार पडला याबद्दल सर्व गणेश भक्तांचे आणि सर्व मानकऱ्यांचे आभार मानले.यावेळी खासदार संजय काका पाटील,युवानेते प्रभाकर पाटील,युवानेते रोहित पाटील,मंत्री शंभूराजे देसाई यांनी श्रींचे दर्शन घेतले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.