प्रतिष्ठा न्यूज

दिसला साप की मार ही मानसिकता बदलण्यासाठी शाळांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सर्पमित्र मुस्तफा मुजावर

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : येथील आकाशवाणी केंद्र नजीक असणाऱ्या राजपूत शैक्षणिक संकुलमध्ये नागपंचमीचे औचित्य साधत सर्पमित्र मुस्तफा मुजावर व पक्षीमित्र सचिन शिंगारे यांचा सत्कार करण्यात आला. यांनी निसर्गासाठी दिलेल्या योगदानासाठी हा सत्कार करण्यात  आला. असे मत राजपूत संकुलाचे प्रमुख प्राचार्य एम. एस. राजपूत यांनी व्यक्त केले. त्यांनी आजवर हजारो सापांना व पक्षांना जीवनदान दिले आहे. तसेच निसर्ग व त्याचा समतोल राखण्याचा  वीडाच उचलला असल्याचे राजपूत यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमात बोलताना मुस्तफा मुजावर यांनी राजपूत स्कूलमध्ये खऱ्या अर्थाने नागपंचमी साजरी झाली असे म्हणत, “दिसला साप की मार ही मानसिकता बदलण्यासाठी  शाळांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे” असे सांगितले. येणाऱ्या पिढीवर त्याप्रमाणे संस्कार केले तर पुढील अनर्थ नक्कीच टळेल. त्यासाठी शाळांमधून असे प्रबोधन गरजेचे आहे असेही ते पुढे म्हणाले.
       राजपूत स्कूलमध्ये नागपंचमीचे औचित्य साधत साप व त्यांच्या प्रकारांविषयी माहिती सांगण्यात आली. तसेच विषारी व बिनविषारी सापांचे प्रोजेक्टर वरती  फोटो दाखवण्यात आले. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सापांविषयी असणारे समज, गैरसमज व  शंकांचे निरसन होण्यास मदत झाली.
        या आधुनिक नागपंचमीच्या कार्यक्रमास राजपूत शैक्षणिक संकुलाचे प्रमुख प्राचार्य एम. एस. राजपूत, संचालक अभिजीत राजपूत, कपिल राजपूत तसेच स्कूलच्या मुख्याध्यापिका किमया राजपूत, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.