प्रतिष्ठा न्यूज

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ तासगाव केंद्रात श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह : खासदार संजय काकांनी घेतले स्वामींचे दर्शन

प्रतिष्ठा  न्यूज/किरण कुंभार
तासगाव : *भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे* हे वचन ऐकल्यावर डोळ्यासमोर जी मुर्ती उभी राहते ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज अर्थात अक्कलकोट स्वामी यांची. श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार आहेत.पौराणिक आधारानुसार चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो. तर स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील ‘वटवृक्ष समाधी मठ स्थानी’ माध्याह्न समयी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली असे मानले जाते.आज श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे.
त्यानिमित्ताने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ त्र्यंबकेश्वर शाखा,तासगांव केंद्रामध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह दि.१२ एप्रिल ते १८ एप्रिल २०२३ पर्यंत मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आला.या सप्ताह कालावधीत श्री गुरूचरित्र,श्री नवनाथ,श्री भागवत व श्री श्रीपाद श्रीवल्लभ अशा ग्रंथाचे पारायण घेण्यात आले.सदर पारायणामध्ये 250 सेवेकरी नी सहभाग नोंदवला होता.तसेच सात दिवस गणेश याग,गीताई याग,स्वामी याग,रुद्र याग,मल्हारी याग,चंडीयाग यासारखे विविध याग घेण्यात आले.तसेच अखंड नाम जप व विणा वादन प्रहर घेण्यात आली.या सप्ताहाचा समारोप मंगळवारी बली पूर्णाहुती व सत्यदत्त पुजन,महाआरतीने करण्यात आला. यावेळी 2000 भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन सेवेकरी भक्तांनी केलेल्या सेवेचे कौतुक केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.