प्रतिष्ठा न्यूज

खासदार संजय काका पाटील यांच्यामुळे कवठेमहांकाळ शहरातली जनता आठ दिवसातच समाधानी : नगराध्यक्ष सिंधूताई गावडे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपूर्वी कवठेमहांकाळ नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने भरघोस यश संपादन करून यांनी परिवर्तन घडवले. आठ दिवसातच खासदार संजय काका पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून कवठेमंकाळ शहरासाठी 60 कोटी रुपये पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करून घेतली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल मंगळवार दिनांक रोजी महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केला आहे. सदर शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांना आता श्रेयवादासाठी धडपड सुरू केली आहे. एवढ्या मोठा निधी घरात बसून मंजूर होत नसून त्यासाठी सततचा पाठपुरावा आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारे नेते मंडळी लागतात. दहा महिने सत्ता असतानाही राष्ट्रवादीला जे जमलं नाही ते अवघ्या आठ-दहा दिवसात खासदार संजयकाका पाटील यांनी करून दाखवले, अशी प्रतिक्रिया नूतन नगराध्यक्ष सिंधूताई गावडे यांनी व्यक्त केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.