प्रतिष्ठा न्यूज

तासगाव तहसीलच्या वाहनांच्या लिलावात चांगली वाहनेही भंगारच्या दरात विकल्याची चर्चा…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: बेकायदेशीर मुरूम,वाळू वाहतूक करत असताना महसूल पथकाने पकडलेल्या ट्रक डंपर जेसीबी पिकप ट्रॅक्टर टेम्पो या वाहनांचा लिलाव नुकताच तासगाव तहसील मध्ये पार पडला.पडून असलेल्या एकूण 105 वाहनांपैकी 95 वाहनांचा लिलाव आयोजित करण्यात आला होता.यावेळी 87 वाहनांचा लिलाव करण्यात आला. यावेळी स्थानिक आणि बाहेरून आलेल्या 38 बोलीदारांनी भाग घेतला. लिलाव प्रक्रियेच्या आधी जप्त केलेल्या वाहनांच्या मालकांना दंड भरून आपली वाहने नेण्यास अनेक वेळा सांगण्यात आले होते,परंतु वाहनांच्या किमतीपेक्षा जास्त दंड असल्याने वाहन मालकांनी ती नेली नव्हती.त्यामुळे सर्वच वाहने गंजलेली असल्याचे दाखवून आणि भासवून लिलाव प्रक्रिया घेण्यात आली असल्याचे समजते.या बोली प्रक्रियेत बोलीधारकांनी कोणती स्पर्धा न करता साखळी करून कमी किमतीत वाहने पदरात पाडून घेतल्याची चर्चा लिलाव प्रक्रियेवेळी सुरू असल्याचे बोलले जात आहे.लिलाव प्रक्रियेवेळी प्रत्यक्षात वाहनांच्या मूल्यांकनांपेक्षा अधिक बोली लावणाऱ्यांना विरोध करून बोली लावण्यास विरोध केला असल्याची चर्चा सुरू आहे.त्यामुळे चांगल्या सुस्थितीत असणाऱ्या वाहनांना सुद्धा भंगारच्या दरात खरेदी करून शासनाचे नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे.या लिलाव प्रक्रियेत घेतलेल्या वाहनांचे पार्ट प्रत्यक्ष वाहने नेतेवेळी गायब असल्याचेही काहीजण सांगत आहेत. स्पर्धात्मक बोली झाली असती तर शासनाला अजून मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला असता,परंतु लिलाव प्रक्रियेतील कारभारामुळे शासनाचा मात्र लाखो रुपयांचा तोटा झाला हें मात्र नक्की?
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.