प्रतिष्ठा न्यूज

शिक्षक सेनेच्या वतीने-“वृक्षारोपण पंधरवडा” निमित्ताने सातेफळ येथे वृक्षारोपण

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुखमंत्री- मा.ऊद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यध्यक्ष- ज.मो.अभ्यंकर  यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण पंधरवाडा (प्रेरणा दिन) उपक्रमाअंतर्गत नांदेड जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीने राज्य उपाध्यक्ष- विठुभाऊ चव्हाण यांच्या वतीने सातेफळ या गावी त्यांच्या शेतात दि. 23 जुलै 2023 रोज रविवार दुपारी 1 वाजता आंबा, जांबुळ, चिकू, या फळझाडांचे व विविध जातीच्या वृक्षरोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष- विठुभाऊ चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष- संतोष अंबुलगेकर, खाजगी शाळांचे जिल्हाध्यक्ष- तानाजी पवार, जिल्हा कोषाध्यक्ष- गंगाधर कदम, जिल्हा सरचिटणीस- रवी बंडेवार, जिल्हा सल्लागार- शिवाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष- मुस्तफा शेख, बालाजी भांगे, लहू पंदलवाड, संभाजी पवार,परशुराम मिरेवाड, राहूल बनसोडे, संतोष घटकार, बाबुजी पुट्टेवाड, यांच्यासह शिक्षक सेनेचे अनेक सदस्य उपस्थितीत होते.यावेळी सर्वांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.