प्रतिष्ठा न्यूज

आनंदी फार्मसी कॉलेजला नवीन एम फार्मसीला पीसीआयची मान्यता

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ कळंबे तर्फ कळे ता. करवीर जि. कोल्हापूर च्या आनंदी फार्मसी कॉलेजला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) नवी दिल्ली यांच्याकडून एम फार्म- फार्मासुटिक्स, एम फार्म – फार्मासुटिकल केमिस्ट्री, एम फार्म- फार्मकॉलॉजी या तीन पदव्युत्तर पदवी (पीजी) कोर्सेसना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून नियमित सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या साठी आनंदी फार्मसी कॉलेजच्या माध्यमातून डी.फार्मसी, बी.फार्मसी व आता तीन विषयातून एम फार्मसीच्या शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. या कोर्सेसच्या मान्यतेकरिता संस्थापक अध्यक्ष प्रा. सतिश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई व प्राचार्य डॉ.आर एस आडनाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तरी या कोर्सेसचा लाभ परिसरातील विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष प्रा. सतिश देसाई यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.