प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिका फेरीवाला समिती सदस्य निवडीसाठी उद्या निवडणूक 4 प्रवर्गासाठी 8 उमेदवार रिंगणात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या फेरीवाला समिती सदस्य निवडीसाठी उद्या 23 ऑगस्ट रोजी निवडणूक होत आहे. 8 जागेपैकी 2 जागा बिनविरोध झाल्या असून 2 जागांसाठी नामनिर्देशन आले नसल्याने उर्वरित 4 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी सकाळी 7 ते 3 या वेळेत मतदान प्रक्रिया होत आहे. एकूण 3839 इतके मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून सांगलीतील मतदारांसाठी हिंदू मुस्लिम चौक येथील शाळा क्रमांक 3 मध्ये 2 मतदान केंद्र तर कुपवाड मधील मतदारांसाठी कुपवाड मनपा कार्यालय तर मिरजेतील मतदारांसाठी मिरज हायस्कूल मिरज येथे मतदान केंद्र असणार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी लगेच सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू होणार असून 8 वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येईल. उद्याच्या निवडणुकीसाठी मतदार यादीमध्ये समाविष्ट असणारेच फेरीवाले मतदान करू शकतात.
मतदानासाठी येणाऱ्या फेरीवाले मतदारांसाठी निवडणूक आयोगाने जारी केलेली 17 ओळखपत्रापैकी कोणताही पुरावा ओळखीसाठी ग्राह्य मानला जाईल असेही मनोजकुमार देसाई यानी सांगितले
त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली होती या नाम निर्देशन पत्राची माघारीची काल 21 तारखेपर्यंत माघार घेण्यात ची तारीख होती त्यामध्ये दोन जागा बिनविरोध झालेला असून चार जागेसाठी निवडणूक होत आहेत चार जागेसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत त्याचं मतदान उद्या सकाळी आठ ते तीन वाजेपर्यंत होणार आहे त्यासाठी तीन मतदान केंद्र निश्चित केलेली आहेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे चार नंबर तीन हिंदू मुस्लिम चौक या ठिकाणी दोन मतदान केंद्र आहेत मतदान केंद्र आहे आणि कुपवाड मध्ये कुपवाड प्रभाग समिती कार्यालयात एक मतदान केंद्र या मतदान प्रक्रियेत सर्व फेरीवाल्यांनी मतदान करून शांततेने मतदान करून प्रशासनावर सहकारी कारवास मी विनंती करतो आणि निकाल कधी असणार 3839 मतदार संख्या असून निकाल उद्या पाच वाजल्यानंतर मतमोजणी नंतर निकाल जाहीर करण्यात येईल त्याचबरोबर निवडणूक आयोगाने जाहीर केलेले 17 पैकी सोबत बाळगणे आवश्यक आहे असेही निवडणूक निर्णय अधिकारी देसाई यानी केले.
या वेळी उप आयुक्त वैभव साबळे , ज्योती सर्व दे समन्वय अधिकारी, शिरीष काळे सह अधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.