प्रतिष्ठा न्यूज

सावित्रीबाईंचा जन्मदिवस मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलमधील सर्व क्षेत्रांत भरारी घेणाऱ्या महिलांच्या वेशभूषेत चिमुकल्या मुलीं अवतरल्या होत्या.
        इस्लामपूर येथील मुक्तांगण हे खेळघर म्हणून पश्चिम महाराष्ट्रात ओळखले जाते. इथं अनुभव देत सहज शिक्षण दिले जाते. मुक्तांगण मध्ये सावित्रीच्या लेकी वेगवेगळ्या वेशभूषेत उठून दिसत होत्या.  जगाच्या पाठीवर आता कोणती क्षेत्र पाठीमागे राहिलेली नाहीत की जिथे महिला पुरुषांच्या बरोबरीने काम नाहीत. वेगवेगळ्या क्षेत्रांत पुढे असणाऱ्या महिलांच्या वेशभूषा या छोट्या चिमुकल्या मुलींनी केल्या होत्या. मुली नटून थटून शाळेच्या आवारात आल्या. गळ्यात व कानात वेगळ्या प्रकारची आभूषणे घातली होती.
     कोण क्रिकेटपटू होते ? डोक्यावर हेल्मेट, हातात बॅट घेत आले होते. कोण बॅडमिंटनपटू  हातात रॅकेट घेत आली होती. वैमानिक, पायलट, लष्करातील अधिकारी, सामान्य कुटुंबातील स्त्री, शेतकरी, शिक्षिका,डॉक्टर, इंजिनीअर तर काही मुली झाशीची राणी, जिजाऊ अशी विविध रूपे या छोट्या मुलींनी साकारली होती. आम्ही सावित्री कुठेही कमी नाही दाखवण्यासाठी मुलींनी सर्वांशी संवाद साधला.
        महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. त्यांची कार्यप्रणाली लहानपणी मुलांच्यात रुजवण्यासाठी मुक्तांगण ने आदर्शवत असा उपक्रम राबवला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.