प्रतिष्ठा न्यूज

स.पो.नि शेवाळे यांची पोलिस नियंत्रण कक्षात रवानगी: गो रक्षकास अर्धनग्न करून केली होती मारहान

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट

नांदेड : किनवट तालुक्यातील इस्लापुर येथील पोलीस स्टेशन मध्ये अर्धनग्न करून युवकांना मारहाण करण्यात आली होती.कत्तलीसाठी जाणारे गोधन थांबवुन ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बजरंग दल, विहींपच्या शिवणी येथील कार्यकर्त्यांना अर्धनग्न करून मारहाण करणारे इस्लापुर पोलीस स्टेशनचे सपोनि रघुनाथ शेवाळे यांना निलंबित करा व तसेच या मारहाण प्रकरणाचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता.या प्रकरणी दि.12 फेब्रुवारी 2023 रोजी नांदेडचे पोलीस अधीक्षक मा.श्रीकृष्ण कोकाटे, यांनी सदर घटनेची सत्यता पडताळणी करण्यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी कंधार, यांचे कडे सदर प्रकरणाची प्राथमिक चौकशी देण्यात आली असुन यामध्ये सखोल चौकशी करून, पिडीत व्यक्तीचे जाब जबाज घेवून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याने सांगुन चौकशी पुर्ण होई पर्यंत सपोनि रघुनाथ शेवाळे, पोलीस स्टेशन इस्लापुर यांना पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड येथे सलग्न करण्यात आले आहे.अशी माहीती जनसंपर्क अधिकारी पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड यांचे कडुन देण्यात आली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.