प्रतिष्ठा न्यूज

खाडे शाळेच्या वतीने पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त एम् टी डी के रन चे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
मिरज : सांगली जिल्हा पालकमंत्री तथा कामगारमंत्री महाराष्ट्र राज्य मा. ना. सुरेश भाऊ खाडे यांचा १ जून रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसाचे औचित्य साधून मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरज व मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एम् टी डी के रन स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा रविवार दि २ जून २०२४ रोजी पहाटे ०६:०० वाजता  मा. सुरेश भाऊ खाडे, सुमनताई खाडे संचालक सुजित खाडे व मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करून सुरू करण्यात आली.  या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी इतरही मान्यवर उपस्थतीत होते. या स्पर्धेमध्ये साधारण ६०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.  ही स्पर्धा वयानुरूप तीन गटांमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये १० किमी मिशन चौक मिरज ते अलदार चौक विश्रामबाग परत मिशन चौक मिरज, ५ किमी मिशन चौक मिरज ते भारती हॉस्पिटल चौक मिरज परत मिशन चौक मिरज तर ३ किमी मिशन चौक मिरज ते कृपामाई हॉस्पिटल मारुती मंदिर मिरज परत मिशन चौक मिरज अशा मार्गावरून घेण्यात आली. १० किमी सकाळी ६:०० वाजता, ५ किमी सकाळी ०७:०० तर ३ किमी सकाळी ०७:३० वाजता सोडण्यात आली. याचा निकाल गटानुसार पुढीप्रमाणे ३ किमीमध्ये ७ ते १२ वयोगट मुले प्रथम क्रमांक विराज पाटील द्वितीय क्रमांक ओमकार जाधव तृतीय क्रमांक सुफियान सनदी मुलींमध्ये  प्रथम क्रमांक अल्फिया नदाफ द्वितीय क्रमांक अंजली पाटील तृतीय क्रमांक प्राची शिंदे ५ किमीमध्ये १० ते १६ वयोगट मुले प्रथम क्रमांक वैभव शिंदे  द्वितीय क्रमांक  पार्थ पाटील तृतीय क्रमांक पियूष देसाई मुलींमध्ये प्रथम क्रमांक सिद्धी बनकर द्वितीय क्रमांक दिव्या कोळी  १७ ते २४ वयोगट मुले प्रथम क्रमांक विजय काळे द्वितीय क्रमांक  दिगंबर खोत तृतीय क्रमांक अशितोष लोखंडे मुलींमध्ये प्रथम क्रमांक गौरी गुरव द्वितीय क्रमांक निकिता सूर्यवंशी तृतीय क्रमांक नीलम बागल २५ ते ३५ वयोगट पुरुष प्रथम क्रमांक प्रसाद मोरे द्वितीय क्रमांक कासीम शरीफ तृतीय क्रमांक उत्तम मौले महिलांमध्ये प्रथम क्रमांक प्राजक्ता शिंदे द्वितीय क्रमांक मोहिनी कुलकर्णी तृतीय क्रमांक रोहिणी कोळी ३६ ते ४५ वयोगट पुरुष प्रथम क्रमांक बापू धनवडे द्वितीय क्रमांक सुभाष सूर्यवंशी तृतीय क्रमांक संजय निंबाळकर  महिलांमध्ये प्रथम क्रमांक प्रिया पंडित द्वितीय क्रमांक अनिता देसाई  तृतीय क्रमांक दीपा गायकवाड ४६ ते ५५ वयोगट पुरुष प्रथम क्रमांक बाळासाहेब भजनावळे द्वितीय क्रमांक संदीप मिरजकर  तृतीय क्रमांक अजय देशमुख महिलांमध्ये प्रथम क्रमांक पल्लवी मूग  द्वितीय क्रमांक अपर्णा अवटे तृतीय क्रमांक सुवर्णा तावरे ५६ ते ६४  वयोगट पुरुष प्रथम क्रमांक बाबासाहेब सातपुते द्वितीय क्रमांक विठ्ठल भोसले तृतीय क्रमांक चंद्रकांत शिवणकर महीलांमध्ये प्रथम क्रमांक विद्या चव्हाण द्वितीय क्रमांक जयंती आचार्य  तृतीय क्रमांक सीमा रावल ६५ व त्यावरील वयोगट पुरुष प्रथम क्रमांक दिनकर नाईक  द्वितीय क्रमांक अविनाश वाले तृतीय क्रमांक सुदर्शन मोलमानके महीलांमध्ये प्रथम क्रमांक मालुताई डफळे  १० किमीमध्ये   १० ते १६ वयोगट मुले प्रथम क्रमांक अथर्व शिंदे द्वितीय क्रमांक  शौर्य यादव  मुलींमध्ये प्रथम क्रमांक अक्षरा पवार १७ ते २४ वयोगट मुले प्रथम क्रमांक नागेश कारंडे द्वितीय क्रमांक श्रीधर कांबळे  तृतीय क्रमांक उमेश सकपाळ मुलींमध्ये प्रथम क्रमांक सायली शितोळे २५ ते ३५ वयोगट पुरुष प्रथम क्रमांक युवराज बाबर द्वितीय क्रमांक सागर कचरे तृतीय क्रमांक हर्षद पडूलकर महिलांमध्ये प्रथम क्रमांक रितिका रोकडे  ३६ ते ४५ वयोगट पुरुष प्रथम क्रमांक जब्बार सिंह  द्वितीय क्रमांक सचिन चव्हाण तृतीय क्रमांक रावसाहेब सरगर महिलांमध्ये प्रथम क्रमांक   वैशाली जाधव  द्वितीय क्रमांक अर्चना पांचाळ तृतीय क्रमांक राजश्री पवार ४६ ते ५५ वयोगट पुरुष प्रथम क्रमांक संभाजी काळेल द्वितीय क्रमांक विपुल पाटील तृतीय क्रमांक बसवराज पाटील महिलांमध्ये प्रथम क्रमांक अंजली धुमाळे  ६५ व त्यावरील वयोगट पुरुष प्रथम क्रमांक तुकाराम अनुगडे  द्वितीय क्रमांक सर्जेराव घोरपडे सर्व विजेत्या स्पर्धकांना सर्टिफिकेट, मेडल व ट्रॉफी देण्यात आली. तर सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल, सर्टिफिकेट देण्यात आले आहे,  अशी माहिती आयोजकांनी दिली. सर्व स्पर्धकांना पायलेटिंग करण्यासाठी स्केटींगचे विद्यार्थी उपस्थित होते.  यांनी केले आहे.
        या स्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, प्रशांत खाडे, सुजित खाडे, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.