प्रतिष्ठा न्यूज

उमरा येथील विमलबाई जोशी यांचे निधन- शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट

उमरा प्रतिनिधी: लोहा तालुक्यातील उमरा येथील जेष्ठ महिला विमलबाई श्रीराम (श्यामगुरू) जोशी उमरेकर यांचे दि.13 जानेवारी 2023 रोज शुक्रवारी वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झाले असुन त्यांच्यावर आजच दुपारी 1 वाजता उमरा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अतिशय प्रेमळ स्वभाव असलेल्या कै.विमलबाई जोशी यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असुन कै. विमलबाई जोशी यांचे पश्चात 2 मुले, 3 मुली, सुना, नातु, पणतू, असा मोठा परिवार आहे.
त्या संजयगुरू जोशी, खंडूगुरू जोशी यांच्या आई होत, तर वेदशास्त्र तथा पत्रकार गजानन जोशी व वैभव जोशी, यांच्या आजी होत.
त्यांच्या अंत्यविधीसाठी उमरा परिसरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.