प्रतिष्ठा न्यूज

पैनगंगा नदीवर बंधारे बांधणे आणि सिंचन प्रकल्प,विकास कामासाठी मुख्यमंत्री ना.शिंदे यांच्या कडे खा.हेमंत पाटील यांनी केला पाठपुरावा

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड/ हिंगोली दि.13 : आज दि.12 जानेवारी 2023 रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वर्षा निवासस्थानी हिंगोलीचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या पुढाकारातून पैनगंगा नदीच्या उच्चपातळी बंधारे व विदर्भ मराठवाडा सेतू व विविध मागण्याच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहून विकास योजना, कामासाठी पाठपुरावा करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अनेक कामांना मंजुरी देऊन प्रदीर्घकाळ असलेले प्रश्न तात्काळ सोडवले आहेत. यावेळी हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकनेते बाबुरावजी कदम कोहळीकर, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर,उमरखेड तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ.अविनाश खंदारे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्यासमोर मांडून ते सोडून घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.