प्रतिष्ठा न्यूज

कंधार तालुक्यातील पेठवडज, बारूळ, कौठापरिसरात ढगफुटी,ओहोळास पूर : सोयाबीन ढीग वाहून पिकांचे नुकसान

प्रतिष्ठा न्यूज/राजू पवार
कंधार/नांदेड दि14 : कंधार तालुक्यातील पेठवडज सर्कल मध्ये आज सायंकाळी ठीक 4 वा. अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असून नांदेड- मुखेड मार्गावरील मादाळी येथील ओहोळास पूर आला. सध्या सोयाबीन शेतीत उभे असून पावसाच्या पाण्याच्या मा-यांमुळे सोयाबीन शेंगा फुटून गेल्या आहेत.तसेच काही सोयाबीन च्या कुवाडात पाणी शिरले तर ओहोळाच्या काठावरील मौजे मादाळी येथे सोयाबीन ढीग (वळयी) वाहून गेली आहे.
पेठवडज प्रकल्पा खालील ओहोळास पूर आल्याने जाकापूर- गोणार पुलावरून पाणी गेल्यांने संपर्क तुटला होता. तसेच या भागातील पेठवडज, कौठा, जाकापूर, तेलूर गोणार, शिरसी( बु), शिरसी ( खु), रहाटी, शिरूळ, येलूर, तेलूर, मसलगा, मादाळी, नारनाळी, आदि गावातील सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, हळद पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.गेल्या दोन दिवसात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. तसेच बारूळ, कौठा भागात अतिरिक्त पाऊस, नदी, ओहोळास, ओढयाना आलेल्या पूरांमुळे हाता तोंडासी आलेले सोयाबीन निसर्गाने हिरावून नेले आहे.या भागातील पिकाचे 100%ननुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत पिकांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.