प्रतिष्ठा न्यूज

रामलला पुन्हा राम मंदिरात प्रतिष्ठापित होणे, ही रामराज्याची नांदीच ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था

प्रतिष्ठा न्यूज
अयोध्या प्रतिनिधी : ‘श्रीराम जन्मभूमीसाठी ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर रामजन्मभूमी मुक्त झाली आणि आज साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य राम मंदिराची निर्मिती होऊन रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळा आम्ही आज पहात आहोत, हा सनातन हिंदु धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. देशभरातील सर्व संत-महंतांना मान देऊन आणि त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. रामलला पुन्हा राम मंदिरात प्रतिष्ठापित होणे, ही रामराज्याची नांदी आहे’, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी या वेळी केले.

ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्तीच्या भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस श्री. चंपत राय यांनी सनातन संस्थेच्या दोन्ही आध्यात्मिक उत्तराधिकारी यांना सन्मानपूर्वक आमंत्रित केले होते.

‘आसेतुहिमालयापासून हिंदसागरापर्यंत प्रत्येकाला एकात्मतेच्या बंधनात बांधणारे श्रीराम हे एक अलौकिक राष्ट्रसूत्र आहे ! प्रत्येकाच्या मनातील श्रीरामाच्या मंदिराची उभारणी हे न केवळ अधर्मावर धर्माचा विजय; परंतु त्याचसमवेत कलियुगांतर्गत सत्ययुगाच्या नवनिर्मितीची, हिंदूंच्या अलौकिक ‘हिंदु राष्ट्र निर्मिती’ची, म्हणजेच स्वधर्माधिष्ठित स्वराष्ट्र, सर्वशक्तीसंपन्न, सुव्यवस्थाप्रधान, सर्वसुविधांयुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत सुराज्याच्या सूर्योदयाची नांदी आहेत, असे प्रतिपादन श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी या प्रसंगी केले.

या वेळी दोन्ही उत्तराधिकारींनी श्रीरामाच्या मूर्तीप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होता आले, याबद्दल श्रीरामाच्या प्रती कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त केली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लखनऊ येथील विमानतळावर आगमन झाल्यावर श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे पदाधिकारी तथा उत्तर प्रदेश शासनाच्या राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी यांच्या वतीने त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.