प्रतिष्ठा न्यूज

रायगडावर शिवराज्याभिषेक दिनी सागरा प्राण तळमळला हे नाटक आयोजित केल्या बदल राज्य शासनाचा मराठा सेवा संघाकडून निषेध

शिवराज्याभिषेक सोहळा व मराठा उद्योजक कक्ष वर्धापन दिन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : रायगडावर होणाऱ्या ३४९ व्या शिवराज्याभिषेक दिनी राज्य शासनाने सागरा प्राण तळमळला हे नाटक सादर केले जाणार आहे, दिल्ली येथील महाराष्ट्र भवन मध्ये आहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीमाई फुले यांचे पुतळे हटवून विनायक सावरकर यांचा कार्यक्रम साजरा केला, याचा निषेध मराठा सेवा संघाच्या मासिक बैठकीत निषेध करण्यात आला.
मराठा सेवा संघाची मासिक बैठक रविवारी पार पडली, रायगड येथे दर वर्षी ६ जून रोजी यंदा ३४९ वा शिवराज्याभिषेक होत असून ३५० व्या वर्षाची सुरुवात होत आहे, मात्र ३५० वा शिवराज्याभिषेक दिन अशी चुकीची माहिती सांगून लोकांमध्ये संब्राम्ह निर्माण केला गेला, शिवाय ६ जून ऐवजी आधीच तो साजरा करण्यात आला, शिवाय रायगडावर ज्या विनायक सावरकर यांनी शिवराय हे ककतालीय न्यायाने म्हणजे कावळा बसायला आणि घटना घडायला असे राजे झाले असा अपमान केला, त्यांचे नाटक मुद्दाम रायगडावर सादर करण्यात आले आहे, याचा तीव्र शब्दात सर्व पदाधिकारी यांनी निषेध व्यक्त केला.
त्याच प्रमाणे विनायक सावरकर यांची जयंती साजरी करताना दिल्लीतील महाराष्ट्र भवन मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे पूर्वीचे पुतळे हटवून जयंती साजरी करण्यात आली, याचाही यावेळी निषेध करण्यात आला, तसेच दिल्ली येथे सुरू असणाऱ्या महिला पैलवनांच्या आंदोलनाला पाठींबा देऊन खासदार ब्रिजभूषण यांना पाठीशी घालणारी यंत्रणा यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी डॉ.संजय पाटील, अमृतराव सूर्यवंशी, नितीन चव्हाण, श्रीरंग पाटील, संजय सावंत, प्रणिता पवार, मारुती शिंदे, अर्चना कदम, आशा पाटील, युवराज शिंदे, प्रताप पाटील, देवजी साळुंखे आदींसह इतर कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक सोहळा व मराठा उद्योजक कक्ष वर्धापन दिन
दि ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा व मराठा उद्योजक कक्ष वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त शिवपूजन आणि नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव बिरजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, मराठा सेवा संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम होणार असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन आशा पाटील यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.