प्रतिष्ठा न्यूज

शासनाने मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा : अंबादास दानवे

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : शासनाने आता मराठवाड्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना तात्काळ आर्थिक मदत करावी असे आवाहन  विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते  श्री अंबादास दानवे यांनी केले महाराष्ट्रात तथा मराठवाड्यात मान्सूनचे आगमन उशीर   झाल्यानंतरही अद्याप मोठा पाऊस पडलेला नाही गेल्या एक महिन्यापासून पाऊस पडत नसल्याने अद्यापही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत पेरणी केलेली नाही. आजही शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. ढग येतो पण पाऊस पडत नाही.गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे सध्या जनावरांच्या चाऱ्याचा आणि जनावरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.ते पुढे म्हणाले की,  बी- बियाणे खते  यांचे भाव गगनाला भिडले आहेत.सध्या शेतकरी अडचणीत आहे. मात्र शासनाने  शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याऐवजी राजकारण करीत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. शासनाने शेतक-यांना मोफत खते बी- बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी  विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार  अंबादास  दानवे यांनी केली.
.शुक्रवारी दानवे हे नांदेडला आले होते. शासकीय विश्रांम गृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.    ते म्हणाले की शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी करण्यात आलेली आहे .या कार्यक्रमाला फक्त कार्यकर्तेयांची गर्दी जमविण्याच्या पलीकडे कोणतेही काम करण्यात आले नाही. या उपक्रमात काय साध्य झाले अद्यापही जनतेच्या पदरी निराशाच आलेली आहे. शासन जाहीराती वर  मोठ्या प्रमाणात   खर्च करते. ही दुर्दैवी बाब आहे. या कार्यक्रमात शासन आपल्या दारी नसून कार्यकर्ते आपल्या दारी हेच दिसून आले. जनतेला काही मिळाले नाही. अद्यापही अनेक कामे पेंडिंग आहेत असा आरोपी त्यांनी यावेळी केला.
       दिवसेंदिवस अपुऱ्या पावसामुळे पेरणीचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. त्यामुळे शेतकऱी आर्थिक अडचणीत आहे.  अद्यापही पुरेसा पाऊस पडला नाही त्यामुळे शेतकरी पाऊस केव्हा पडणार याची वाट पाहत आहेत .त्यामुळे शासनाने तात्काळ  मराठवाड्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि  शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
       यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की राज्यात भीषण परिस्थिती आहे , अत्याचार होत आहेत. राज्यात खून होत आहेत.   गोरक्षाची हत्या होत आहे. सरकार कुठे आहे,? शासनाचा थोडा तरी वचक आहे का?  असा सवाल  दानवे यांनी यावेळी उपस्थित केला.
       ते म्हणाले की.जेष्ठ नेते मंत्री हरीभाऊ बागडे यांचा आम्ही आदर करतो.परंतु अशा जेष्ठ नेत्यांना सुद्धा सार्वजनिक कामासाठी,पेंडीग फाईल्स काढण्यासाठी छ.संभाजीनगर येथे  चार चार  तास थांबावे लागते ही दुर्दैवी बाब आहे.अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास जिल्हा प्रमुख,तालूका प्रमुख तथा     शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.