प्रतिष्ठा न्यूज

अष्टपैलू- शिक्षक ते शिक्षणविस्तार अधिकारी- रत्नाकर पाटील मुंगल यांचा सत्कार समारंभ सोहळा

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : मुदखेड तालुक्यातील इजळी येथे एका सामान्य व शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले रत्नाकर गोविंदराव पाटील मुंगल यांच्या आईचे नाव  सुभद्राबाई व वडील गोविंदराव पाटील मुंगल हे होते. बालपणीचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत पूर्ण  पुढील 5 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा मुदखेड येथे झाले. 11वी 12 यशवंत कॉलेज नांदेड झाल्यानंतर 1981-82 डी एड धर्माबाद येथे पूर्ण केले व सन 1984 मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून भोकर तालुक्यात हातनी येथे प्रथम नियुक्ती मिळाली येथे एक वर्ष सेवा झाल्यानंतर 1985 ते 1999 मध्ये किनवट तालुक्यात अतिदुर्गम भागात सेवा प्रामाणिकपणे सेवा केल्यामुळे या आदिवासी भागातील अनेक विद्यार्थी अधिकारी व उद्योजक म्हणून काम करत आहेत.
किनवट तालुक्यात 14 वर्षे सेवा करून ते मुदखेड तालुक्यात मेंडका येथे 1999 ते 2008 एकूण 9 वर्षे सेवा करून पदोन्नती मुख्याध्यापक म्हणून मुदखेड तालुक्यातील दरेगाव येथे रुजू झाले या ठिकाणी सन 2008 ते 2015 पर्यंत प्रामाणिक सेवा करून ते  मुदखेड येथील केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सन 2015 ते 2019  म्हणून अविरत कार्य करून मुदखेडच्या शाळेला गुणवत्ता वाढीस वैभव प्राप्त करून दिले त्यानंतर त्यांची बदली हदगाव तालुक्यात धोगरी या शाळेत झाली तेथे त्यांनी दोन वर्षात त्या शाळेचे नाव मोठे केले.
परत ऑनलाईन बदली मध्ये मुदखेड तालुक्यातील मेंडका प्राथमिक शाळा येथे सन 2018 ते 22 पर्यंत मुख्याध्यापक व मुदखेड केंद्राचा केंद्रप्रमुख पदाचा कार्यभार सांभाळला.नोव्हेंबर 2022 मध्ये नांदेड येथे चौफाळा बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून रुजू झाले या ठिकाणी त्यांनी निस्वार्थ भावनेने व शिक्षण प्रवाहाच्या दिशेने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असतांना ते नियत वयानुसार दि.30 जुलै 2023 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
अशा अष्टपैलू प्राथमिक शिक्षक-(पदोन्नतीतून) मुख्याध्यापक- केंद्रप्रमुख ते शिक्षणविस्तार अधिकारी म्हणून 39 वर्षे यशस्वीरित्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करून सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्याचा सन्मान होण्याच्या हेतूने व त्यांनी केलेल्या या शैक्षणिक योगदान कार्याबद्दल त्यांचा गौरव सोहळा कार्यक्रम म्हणून चौफाळा बिट क्र.03 च्या वतीने सेवापूर्ती समारोप कार्यक्रमाचे आयोजन दि.3 जुलै 2023 रोज सोमवारी सकाळी ठिक 11वाजता प्रतिभा निकेतन हायस्कूल होळी, नांदेड. या ठिकाणी होणार आहे.
तरी बिट मधीन सर्व शाळेचे मुख्याध्यापक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.