प्रतिष्ठा न्यूज

सध्या सहकार चळवळ मोडीत काढण्याचा सुरू असलेला प्रयत्न दुर्दैवी बाब : आमदार सुमनताई पाटील ; इस्लामपुरच्या इंद्रप्रस्थ पत संस्थेच्या तासगाव शाखेचे उद्घाटन

प्रतिष्ठा न्यूज
तासगाव प्रतिनिधी : सहकारी संस्थामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने आर्थिक परिवर्तन झाले आहे. सहकारी संस्था शेतकऱ्यांच्याच आधारस्तंभ असल्या तरी ही सहकार चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे ही दुर्दैवी बाब असल्याचे प्रतिपादन आमदार सुमनताई पाटील यांनी येथे बोलताना केले.
सांगली जिल्हा सहकारी बँकचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील (तात्या) संस्थापक मार्गदर्शक असलेल्या इस्लामपुरच्या इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पत संस्थेच्या तासगाव येथील आठव्या शाखेचे उद्घाटन आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते, दिलीपराव पाटील (तात्या) यांच्या अध्यक्षतेखाली, सांगली जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अविनाश पाटील (काका), स्वामी रामानंद भारती सहकारी सूत गिरणीचे माजी अध्यक्ष राजारामबापू पाटील, राजारामबापू, सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील (अण्णा) आणि तासगाव तालुक्याचे युवानेते प्रभाकर पाटील व अंकलखोपचे उद्योजक सतिश पाटील (आबा) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी आमदार सुमनताई पाटील बोलत होत्या.
आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘इंद्रप्रस्थ’ पतसंस्थेचे संस्थापक मार्गदर्शक दिलीपराव पाटील (तात्या) यांनी संचालक मंडळ, कर्मचारी यांनी निरपेक्ष भावनेने काम केले तर ठेवीदारांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण होते आणि ठेवीमध्ये वाढ होऊन ती संस्था प्रगतीपथावर जाते. अशा आर्थिक संस्थेचा लाभ लहान मोठे उद्योजक शेतकरी, व्यापारी यांना होऊन सामाजिक प्रगती होते असे स्पष्ट करून आपली इंद्रप्रस्थ पतसंस्था तासगाव परिसरात गरजवंताला नि:पक्षपातीपणाने मदत करेल आणि या भागाच्या आर्थिक विकासात मोलाचे सहकार्य करेल असा विश्वास व्यक्त केला.
प्रारंभी ‘इंद्रप्रस्थ’ पतसंस्थेचे अध्यक्ष युवराज सुर्यवंशी यांनी इंद्रप्रस्थ पतसंस्थेच्या 80 कोटी रूपयांच्या ठेवी असून येत्या काही दिवसात शंभर कोटी रूपयांच्या ठेवींचा टप्पा पार करेल असा विश्वास व्यक्त करून तासभाव शाखेतच एक कोटी ऐशी लाख रूपयांच्या ठेवी जमा झाल्याचे अभिमानपूर्वक सांगितले.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अविनाश पाटील (काका) यांनी तासगाव तालुका हा द्राक्षबागायतदारांचा तालुका आहे. येथे ठेवीही मिळतील आणि चांगले कर्जदारही मिळतील त्यामुळे या पतसंस्थेला तासगाव तालुक्यातील लोकांना नक्की फायदा होईल. तो इथल्या उद्योजक, शेतकरी यांनी करून घ्यावा असे आवाहन करून पतसंस्थेला शुभेच्छा दिल्या.
राजारामबापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले रिझर्व्ह बँकेच्या कडक धोरणामुळे व अनेक निर्बंधामुळे जिल्ह्यातील अनेक नागरी बँका बंद पडल्या आहेत अशा पार्श्वभूमिवर इंद्रप्रस्थ पतसंस्था शंभर कोटी रूपयांच्या ठेवीकडे वेगाने वाटचाल करीत आहे ही बाब कौतुकास्पद आहे.
सहकारात प्रदीर्घकाळ काम केलेल्या आणि हरहुन्नरी असलेल्या दिलीपराव पाटील म्हणजे एक ब्रँड आहेत; जिल्हा बँकेला आपल्या कारकिर्दित यशाच्या शिखरावर नेण्याची किमया त्यांनी केली असे गौरवोद्वार स्वामी रामचंद्र भारती सूतगिरणीचे माजी अध्यक्ष राजारामबापू पाटील यांनी काढले व केवळ त्यांच्या नावावर इंद्रप्रस्थ पत संस्थेकडे कोटयावधी रूपयांच्या ठेवी जमा होतील असे स्पष्ट करून त्यांनी दिवंगत नेते आर. आर. पाटील आबा व दिलीपराव पाटील तात्या यांच्या मैत्रीतील अनेक किस्से सांगितले.
उद्योजक सतिश पाटील (आबा) यांनीही आर. आर. पाटील आबांच्या पश्चात आमदार सुमनताई पाटील यांच्या निवडणूकीत त्यांना विजयी करण्यात दिलीपराव पाटील तात्या यांनी दिलेल्या योगदानाची आठवण सांगितली. युवा नेते प्रभाकर पाटील यांनी तालुक्यातील नवउद्योजकांना इंद्रप्रस्थ पतसंस्था आर्थिक पाठबळ देईल आणि तरूणांना स्वावलंबी बनविण्यात मोठा सहभाग घेईल अशा आशावाद व्यक्त केला.
यावेळी सर्व श्री. अभिजित तानाजी पवार, किरण विलास माने, सुनिल सदाशिव माळी, शिवशंकर आप्पासाहेब शेटे, युवराज विष्णुपंत हुलवाने, अगर भीमराव शिंदे (सर्व तासगाव), प्रदीप आप्पासाहेब पवार (गणेशजूरी) आणि विनायक आनंदा शिंदे (बलगवडे) या इंद्रप्रस्थ तासगाव शाखा सल्लागार संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आभार शाखा सल्लागार संचालक अभिजित तानाजी पवार यांनी मानले तर श्री. माणिक पाटील (वाळवा) यांनी सुत्रसंचालन केले
इंद्रप्रस्थ तासगाव शाखा उद्घाटन समारंभास माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील, माजी उपनगराध्यक्ष जालिंदर जाधव, पलूस बाजार समिती उपसभापती भगवान काशीद, ओबीसी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष करण पवार युवक राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अभिजीत पाटील, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष गजानन खुजट तासगाव अर्बन बँक संचालक बंडोपंत शेटे, गाजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील, माजी नगरसेवक आनंदराव मानकर, प्रा. डी. ए. माने. प्रा. जे. के. पाटील, अरुण साळुंखे, रघुनाथदादा, राजेंद्र यादव, शितल पाटील, शेतकरी विणकरी सूतगिरणी इस्लामपूर वेअरमन बबनराव धोटे, डॉ. मानसिंग जाधव, अॅड. अमित शिंदे, रा.बा.पा. साखर कारखाना संचालक माणिक शेळके प्रकाश कांबळे, इंद्रप्रस्थ पतसंस्थेचे उपाध्यक्ष विश्वास धस, जेष्ठ संचालक मोहनराव शिंदे, अधिक चव्हाण, सुहास हांडे, इंद्रप्रस्थचे जनरल मॅनेजर राजाराम कटारे तासगाव शाखाधिकारी चंद्रदीप पाटील आष्टा, मणेराजूरी या इंद्रप्रस्थ शाखांचे सल्लागार संचालक, तसेच महावीर होरे, प्रमोद कदम यांच्या सह ठेवीदार, महिला व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.