प्रतिष्ठा न्यूज

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भविष्यवेधी प्रकाश बिरजे, आमदार सुधीर गाडगीळांच्‍या कार्यालयात अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली ता. ६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तृत्व सर्वव्यापी होते. केंद्रीय मंत्री असताना जल, उर्जा पर्यावरण क्षेत्रात त्यांनी केलेले काम उत्तुंग आहे. शेतीसह औद्योगिककरणाव्दारे रोजगार उपलब्ध करून द्यावेत, असे त्यांनी १९४२ सालीच सांगितले होते. धरणाचे नियोजन त्यांच्यात काळात ठरवले गेले. विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी
केलेले काम आणि त्यांचे विचार भविष्याचा वेध घेणारे होते, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश बिरजे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित आमदार सुधीर गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, लोकसभा समन्वयक दीपक शिंदे, माजी नगरसेवक सुब्राव मद्रासी, मुन्ना कुरणे, विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, माजी
नगरसेविका अप्सरा वायदंडे, सोनाली सागरे, प्रीती काळे, प्रियानंद कांबळे, गौस पठाण, हेमलता मोरे, भालचंद्र साठ्ये, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित
होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.