प्रतिष्ठा न्यूज

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी विलिंडन महाविद्यालयाच्या श्रावणी मोहितेची विद्यापीठ संघामध्ये निवड

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : के.आय.टी.कॉलेज कोल्हापूर येथे झालेल्या आंतर विभागीय जिम्नॅस्टिक स्पर्धेमधून विलिंडन महाविद्यालयातील विद्यार्थीनी श्रावणी जीवन मोहिते (बी.ए.भाग २) हिने प्रथम क्रमांक मिळविला असून तिची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ जिम्नॅस्टिक स्पर्धा पंजाब विद्यापीठ चंदीगड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघामध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.व्ही.ताम्हणकर, उपप्राचार्य डॉ.एस.जी. कुलकर्णी, जिमखाना समिती अध्यक्ष डॉ.राजू कांगणे, रजिस्टर हनुमंत उपळावीकर, प्राध्यापक वाडकर यांच्या उपस्थित करण्यात आला. या मिळालेल्या यशासाठी तिला डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगली विभागीय अध्यक्ष डॉक्टर विश्राम लोमटे सदस्य रामकृष्ण पटवर्धन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आर. ए. कुलकर्णी उपप्राचार्य डॉक्टर एस. आर. कुंभार आदींनी शुभेच्छा दिल्या तर शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश सिंहासने, योगिता परमणे ,अशोक आंबोळे यांनी मार्गदर्शन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.