प्रतिष्ठा न्यूज

प्रलोभ कुलकर्णी यांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्काराने शुक्रवारी सन्मान होणार

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि.23 : सेवा हे यज्ञकुंड, समिधासम हम जले ध्येय, महासागर मे, सरित  रूप हम मिले  लोकयोग क्षेम ही राष्ट्र अभय गान है सेवारत व्यक्ती व्यक्ती कार्य काही प्राण है|
शिक्षण प्रक्रिया शिक्षक आणि विद्यार्थी या महत्त्वपूर्ण घटकां भोवती मुख्यत: फिरत असते किंबहुना तेच दोन महत्त्वाचे घटक असतात. प्रत्येक राष्ट्राचा समाज हा शिक्षक घडवत असतो. पिढ्यानपिढ्या राष्ट्र कसे घडते कसे घडवले जावे याची संस्कार त्या राष्ट्रातील शिक्षकच करत असतात. मुलांना समजून घेऊन त्यांना विकसित करणे हे काम जरी शिक्षकाचे असले तरी मुलांमध्ये राष्ट्रहिताकडे नेणारा विचार रुजवणे व तसा राष्ट्रप्रेमी नागरिक घडविणे यात शिक्षकांचे कसब लागते विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या पिढ्यांचा राष्ट्रासाठी सकारात्मक उपयोग कसा होईल अशी दूरदृष्टी ठेवणारा शिक्षक श्रेष्ठ ठरत असतो. अशा दूरदृष्टी असणारा शिक्षकांमध्ये नांदेडच्या जिल्हा परिषद  हायस्कूल वाघीचे  शिक्षक प्रलोभ माधवराव कुलकर्णी यांचा उल्लेख प्राधान्याने करावा लागेल
शिक्षकांचे व्यक्तिमत्व जेवढे प्रभावी ज्ञान समृद्ध असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. प्रलोभ कुलकर्णी हे शारीरिक शिक्षण देणारे व स्काऊट गाईड चे शिक्षण  देणारे शिक्षक विद्यार्थ्यांना विविध खेळ शिकवतात विद्यार्थ्यांमधले गुण तर त्यांना  कळायचे  पण शिवाय विद्यार्थ्यांच्या कलही कळायचा यातून त्यांनी मुलांना स्वदेशी खेळासोबतच विदेशी खेळही शिकवायला प्रारंभ केला जिल्हा परिषद हायस्कूल बारड,विष्णुपुरी , माळकौठा, वाघी येथे आल्यापासून विद्यार्थ्यांना कुस्ती कबड्डी, खो-खो, क्रिकेट ,रब्बी, बेसबॉल, कराटे, हॉकी, ॲथलेटिक्स आदींसह असंख्य खेळ कुलकर्णी सरांनी खेड्यापाड्या नेऊन पोहोचवले. जे खेळ खेड्यातल्या विद्यार्थ्यांनी पाहणे तर दूरच ऐकलेही नसेल ते खेळ सरांनी विद्यार्थ्यांना साहित्य साधनांसह खेळविले नुसते खेळविले नाही तर त्या खेळात  सरांचे शेकडो विद्यार्थी आत्तापर्यंत विभागीय राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहेत हजारो विद्यार्थ्यांना यामुळे दहावीच्या परीक्षेत खेळाची अतिरिक्त गुण मिळण्यास मदत झाली कित्येकांना पोलीस किंवा अन्य नोकरांमध्ये खेळाचा प्रमाणपत्राची मदत झाली आज महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात गेला तर  सरांचे किमान दहा विद्यार्थी सापडतील विद्यार्थ्यांसाठी सर्वस्व वाहून  घेतलेला हा शिक्षक आहे .
कोणतेही काम निस्वार्थपणे केले की ईश्वरही त्याकामात यश देतो असे म्हणतात. त्याचप्रमाणे प्रलोभ सर ही सर्व सेवा याच भावनेने करतात कुणा विद्यार्थ्याला खेळाचे बूट घेऊन दे कुणाला खेळास गणवेश दे कोणाला स्पर्धेला जाण्यासाठी पैसे नाहीत त्याची व्यवस्था कर स्पर्धेत कोणी आजारी पडले तर त्या खेळाडूंच्या खर्चासह काळजी घेणे अशी सगळी सेवा अगदीच निस्वार्थीपणे करणे हे जणू प्रलोभ सरांच्या रक्तातच भिनल आहे.
कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करणारा हाडाचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे साहेबां पासून ते सेवकापर्यंत कोणीही कोणतेही काम सांगितले की ते लगेच करणार .माझा काय फायदा होईल असा विचारही त्यांच्या मनाला स्पर्श करून जाणार नाही.फक्त हे काम प्रामाणिक पणे चांगले झाले पाहिजे एवढ्या ध्यासाने ते काम करतात.
नांदेड जिल्ह्यातल्या जवळपास तीस जिल्हा परिषद हायस्कूलच्या शाळांना त्यांनी विज्ञान प्रयोग शाळा सी एस आर फंडातून प्राप्त करून दिले आहेत. *प्रशासनाचा विश्वासू* जिल्ह्यात जिल्हा प्रशासन असो किंवा जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, वनविभाग, एस टी महामंडळ, विद्यापीठ, जिल्हा क्रीडा कार्यालय या विभागास विद्यार्थी शिक्षक यांच्याशी संबंधित कार्यक्रम असेल तर प्रशासनाच्या तोंडी पहिले नाव येते ते प्रलोभ कुलकर्णी यांचे अगदी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, वनाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी आदी सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील प्रमुख नेते  मंत्री ,आमदार खासदार पदाधिकारी यांनी सुद्धा कार्यक्रम आयोजनाबद्दल प्रलोभ कुलकर्णी सरांना अनेकदा शाबासकी दिली आहे. कार्यक्रमांचे अचूक नियोजन प्रोटोकॉल नुसार कार्यक्रम रन करण्याचा कसं प्रलोभ सरांमध्ये आहे. त्यामुळे कोणताही मोठ्या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन असो अथवा संपूर्ण नियोजन प्रलोभ कुलकर्णी तिथे असतील तर कार्यक्रम यशस्वी होणारच हा प्रशासनाचा विश्वास झाला आहे.
*समाज सेवा हाच श्वास* प्रलोभ कुलकर्णी सरांचा समाजसेवा हाच तर श्वासच आहे कोणी ओळखीचा असो वा नसो त्याला मदतीची गरज आहे. तिथे सर धावून जातात प्रलोभ सर कुठेही घाईत कामाला निघाले अथवा शाळेत निघाले वाटतच कुणाचा फोन आला की गंभीर पेशंटला रक्त पाहिजे काहीही करा सर पण रक्ताची व्यवस्था करा शाळेचे जाता जाताच प्रलोभ सर आपल्या संबंधातल्या लोकांना पुन्हा फोन करणार आणि अर्धा तासाच्या आत पेशंट पर्यंत रक्ताची बॅग पोहोचवणार अशी त्यांची सेवा शेकडो लोकांनी अनुभवली आहे. अनाथ गरीब होतकरूंना मदत करणे त्यांना छोटा-मोठ्या नोकऱ्यांसाठी कुणा व्यापारांकडे, खाजगी शाळा, कार्यालयात वगैरे शिफारस करणे अशी काम तर त्यांची रोज चालू असतात.
*स्काऊट गाईड प्रशिक्षण आयुक्त* म्हणून जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देणे, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे राज्य राष्ट्रपती पुरस्काराला मुलांना बसण्यासाठी प्रोत्साहित करणे खेळासोबत शाळेचा शिक्षणाचा एक भाग म्हणून शाळांमध्ये स्काऊट गाईडचे पथक स्थापन करून विद्यार्थ्यांना शिस्त व देशभक्तीचे शिक्षण,  स्वावलंबन, सर्वधर्मसमभाव  राष्ट्रभक्ती चे धडे प्रलोभ सरांनी आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना दिले आहे.जवळ पास शंभर हून अधिक स्काऊट गाईड च्या मुलांना राज्य पुरस्कार व राष्ट्रपती पुरस्कार होण्या करिता मदत आणि मार्गदर्शन केले आहे. जवळ पास नऊ ते दहा राष्ट्रीय मेळावे तसेच जपान ,अमेरिका सिंगापूर आदी देशात सुद्धा त्यांनी आंतरराष्ट्रीय मेळाव्यात सहभाग नोंदवला आहे.स्काऊट गाईड विभागाचे प्रशिक्षण आयुक्त म्हणून प्रलोभ कुलकर्णी हे जिल्ह्याचे प्रशिक्षण आयुक्त म्हणून ही कार्यरत आहेत त्यांना आज क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार राज्य शासनाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. तोही एक उत्कृष्ट स्काऊट शिक्षक म्हणूनच मिळाला आहे राज्यभरातून सर्व जिल्ह्यातून फक्त एकच हा पुरस्कार दिला जातो त्यामुळे या पुरस्काराचे महत्व मोठे आहे. प्रलोभ कुलकर्णी सरांनी आतापर्यंत ज्या ज्या शाळेत नोकरी केली त्या सर्व शाळा ही अत्यंत सुंदर केलेल्या आहेत. गावकरी, पदाधिकारी आणि प्रशासनाकडून निधी अनुदान प्राप्त करून तो शाळांच्या विकासासाठी लावला आहे अनेकदा पदरचे पैसे खर्च करूनही त्यांनी शाळेच्या गरजा पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या अर्धांगिनी ही या शिक्षणाच्या पवित्र पैशात कार्यरत आहेत. आई-वडिलांकडून आलेला शिक्षक की पेशांचा वारसा आणि सेवावृत्ती प्रलोभ कुलकर्णी सरांना नेहमी प्रेरित करत असते जिल्ह्यात आणि राज्यभरात शेकडो हजारोंनी मित्रपरिवार असणाऱ्या खरा सेवाभावी वृत्तीच्या  शिक्षकाला राज्य शासनाने उत्कृष्ट शिक्षण पुरस्काराचे सन्मानित केले आहे. प्रलोभ कुलकर्णी यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे जिल्ह्यातील शारीरिक शिक्षक आणि स्काऊट गाईड  बांधवांना अभिमान वाटणार आहे. आज 24 फेब्रुवारी 2023 रोजी  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. ना.श्री  देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्राचे शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री मा.ना.श्री. दिपकजी केसरकर , पर्यटन, कौशल्य विकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग, मंत्री महाराष्ट्र राज्य, मा.श्रीमती पूनम महाजन लोकसभा सदस्य, मा. ॲड. आशिषजी शेलार विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य, मा श्री रणजीतसिंगजी देओल भा. प्र. से. प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य , मा. श्री सुरजजी मांढरे भा.प्र.से. आयुक्त, शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे रंगशारदा सभागृह वांद्रे (पश्चिम) मुंबई होत आहे. प्रलोभ कुलकर्णी यांचे या पुरस्काराबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.