प्रतिष्ठा न्यूज

संयोगिता पाटील केंब्रीज स्कूल मध्ये ‘फादर्स डे’ साजरा

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मिरज येथील संयोगिता पाटील केंब्रिज स्कूल मध्ये ‘फादर्स डे’उत्साहात साजरा करण्यात आला .या दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना निमंत्रित करण्यात आले होते .सर्वप्रथम त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दैनंदिन परिपाठ झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक नाटिका , मार्गदर्शनपर चित्रफिती व गीत सादर केले. त्यानंतर पालकांनी आपले मनोगते व्यक्त केली .त्यामध्ये ते म्हणाले आज कालच्या या धक्काधकीच्या जीवनामध्ये वडिलांकडे लक्ष देणारे विद्यार्थी येथे आम्हाला दिसले.आई वडिलांची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.वडिलांचे कार्य हे खूप मोठे असते, शाळेतील शिक्षक हे वडिलांची भूमिका बजावत असतात.नेहमी आपल्या वडिलांचा व शिक्षकांचा आदर करावा . आपण करमणुकीच्या साधनांपासून वंचित राहिले पाहिजे .जी पी एम टी चे नाव मोठे करा. आपणच आपल्या शाळेत वक्ता म्हणून यावे एवढे मोठे तुम्ही व्हा. वडिलांच्या घामाचे ऋण कधीही आपण फेडू शकत नाही .या वयामध्ये वडिलांबरोबर मित्रांसारखे वागा .भावी आयुष्यात त्यांचे मार्गदर्शन नेहमी मोलाचे ठरते. पालकांनी विद्यार्थ्यांकडून काहीतरी अपेक्षा ठेवलेले असतात आणि त्याच तुम्ही पूर्ण करण्यासाठी नेहमी उंच भरारी घ्या. आजचा भ्रष्टाचार बघता मुलांनी चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे .मुलांनी आपल्या पालकांना वृद्धाश्रमामध्ये पाठवू नये ,ही आजकालची शोकांतिका आहे. आम्ही सर्वजण भारावून गेलो आहोत ,पालकांनी सर्व शिक्षकांचे मन भरून कौतुक केले .त्यानंतर मुलांनी पालकांच्या बद्दल असलेल्या भावना व प्रेम व्यक्त केले.
स्कूलचे मुख्याध्यापक श्री साहेब लाल शरीक मसलत सरांनी पालकांचे आभार मानले ‘पिता धर्म ,पिता स्वर्ग, पिताही परम तप ‘या श्लोकांचा अर्थ स्पष्ट केला . वडिलांच्या कार्याचे मूल्यमापन आपण करू शकत नाही .वडिलांच्या प्रत्येक कृती मागे कुटुंबाचे हित लपलेले असते .वडील हे तुमच्या ऊर्जेचा स्त्रोत आहे ,ते तुमचा आत्मविश्वास वाढवतात नी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ,वडिलांचे महत्त्व जाणून घ्या .आज आपण बघतोय चार ते पाच मुलांचे संगोपन आपले वडील करतात, पण म्हातारपणी मात्र तीच मुले सांभाळ करण्यासाठी तयार नसतात की आज कालची शोकांतिका आहे .घरी जाऊन पालकांना घट्ट मिठी मारा . नेहमी पालक डे साजरा केला पाहिजे.
या कार्यक्रमास पालक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.