प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, जि.प.सदस्य दशरथ लोहबंदे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

प्रतिष्ठा न्यूज /राजू पवार
नांदेड दि.16 : नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालूक्यातील मौजा पांडूर्णी येथील रहिवासी तथा राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, फुलवळ ( ता.कंधार) चे विद्यमान जि.प.सदस्य श्री दशरथराव लोहबंदे यांनी नुकताच शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबई येथे मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे ,शिवसेना प्रवक्तया श्रीमती सुषमा अंधारे,खा.अनिल देसाई यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
माजी जि.प.सदस्य श्री दशरथराव मंगाजीराव लोहबंदे यांचा मुखेड,कंधार,लोहा,बिलोली,देगलूर तालुक्यात मोठा, दांडगा जनसंपर्क आहे. ते गेल्या 20 ते 25 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. ते पेठवडज ( ता.कंधार) सर्कल चे सुद्धा जिल्हा परिषद सदस्य होते. नांदेड जिल्ह्यातील,या भागातील ते शाहू फुले आंबेडकरवादी प्रख्यात विचारवंत म्हणून ओळखले जातात. या भागात त्यांच्या विचाराचे असंख्य कार्यकर्ते आहेत,त्यामुळे नांदेड जिल्हयात शिवसेनेला ( उद्यव बाळासाहेब ठाकरे) सेनेला अधिक बळ मिळणार असून याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत फायदा होणार आहे.
विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री दशरथ लोहबंदे यांच्या सोबत श्री बालाजी पाटील सुगावकर ( सदस्य जि.प.), श्री शिवाजी गेडेवाड,श्री श्रीकांत काळे ( देगलूर), श्री बालाजी पाटील ढोसणे,श्री पंडित ढवळे,श्री राहुल लोहबंदे,श्री योगेश पाटील भगनूरकर,श्री यंकटराव घोरपडे,श्री गणेश डुबूकवाड,श्री अजित पाटील पाळेकर,श्री बापूराव कांबळे,अदवान पाशा,श्री पांडुरंग अडगुलवार,श्री शिवाजी टाळीकोट यांचा समावेश आहे.
माजी मुख्यमंत्री ना.ऊद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला. तर श्री जि.प.सदस्य श्री दशरथ लोहबंदे यांनी यावेळी ना.उद्धव ठाकरे यांना मशाल,शाल,श्रीफळ,पुष्पहार भेट देऊन सत्कार केला.
या सर्व कार्यकर्त्यांचे जिल्हा प्रमुख श्री दत्ता पाटील कोकाटे,उपजिल्हा प्रमुख श्री भालचंद्र नाईक,माजी आ.श्री रोहिदास पा.चव्हाण, श्री महेश पाटील देगलूरकर,श्री मुक्तेश्वर धोंडगे,श्री परमेश्वर जाधव, युवा सेना प्रमुख श्री भागवत पाटील सोमुरकर,डॉ.पन्नासे कवठेकर, आदी जणांनी अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.