प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू – यात ऊसतोड कामगार बापलेकीसह-शेतमजुराचा समावेश, लोहा व हिमायतनगर तालुक्यातील घटना

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : लोहा तालुक्यातील धावरी तांडा येथे ऊसतोड मजुरावर आज दि. 18 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता वीज कोसळली. यात 3 जणांचा मृत्यू झाला. तर जखमी बालिकेला नांदेड येथील दवाखान्यात नेण्यात आले आहे.
धावरी तांडा परिसरातील भागात ऊसतोड मजूर काम करत होते.आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वादळी वारे, विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला असता हे मजुर झाडाचा आसरा घेण्यासाठी गेले होते. यात माधव पिराजी डुबुकवाड -वय 45 वर्षे रा. पानभोसी,ता.कंधार, मोतीराम शामराव गायकवाड -वय 46 वर्षे रा.पेठपिंपळगाव ता.पालम जि.परभणी व रूपाली पोचिराम गायकवाड- वय 10 वर्षे हिच्यावर वीज पडली. यात तिघांचाही होरपळून जागीच मृत्यू झाला. व पूजा माधव डुबुकवाड ही लहानमुलगी गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नांदेड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
हे 3 मृतदेह लोहा येथील सरकारी दवाखान्यात आणण्यात आले असून तहसीलदार तसेच पोलीस प्रशासन, सरपंच,पोलीस पाटील,यांनी घटनास्थळास भेट दिली असुन. या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ करण्यात येत आहे.

तर दुसरी घटना हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा भागात घडली असुन यात एक शेतकरी मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे
हिमायतनगर तालुक्यात दुपारी 2 वाजेच्या सुमारास चक्री वाऱ्यासह तुफान पाऊसाला सुरूवात झाली,असता सिबदरा भागातील शिवारात सोयाबीन काढणीसाठी गेलेल्या 2 शेतकऱ्यांवर अचानक वीज पडली असता त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला.

वारंगटाकळी येथील शेतकरी सुनील साहेबराव वायकोळे, वय 34वर्षे हे सोयाबीन काढणीसाठी सिबदरा येथे गेले होते. अचानक 2 वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली असता सोयाबीनवर ताडपत्री टाकण्यासाठी पळापळ करत असलेल्या 2 शेतकऱ्यावर एकदम वीज पडली, त्यात 1 जनाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा शेतकरी गजानन टोकलवाड हा गंभीर जखमी झाला आहे. ही माहीती घटनास्थळाजवळ उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.