प्रतिष्ठा न्यूज

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची लुटमार थांबवण्यासाठी सुराज्य अभियानांतर्गत परिवहन आयुक्तांची भेट : खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाईचे परिवहन आयुक्तांचे आश्वासन !

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून ऐन सणासुदीला प्रचंड भाडेवाढ करून प्रवाशांची लुटमार आता नित्याचीच झाली आहे. सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची लुटमार थांबवण्यासाठी आज हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले. त्यावर त्यांनी खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना सूचना देण्यात येतील, असे आश्वासन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी या वेळी शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळामध्ये अधिवक्ता (सौ.) किशोरी कुलकर्णी, भगवा गार्डचे राष्ट्रीय समन्वयक श्री अवधूत वसंत, ‘नॅशनल प्रोग्रेस यूथ असोसिएशन’चे श्री. रोहिदास शेडगे आणि ‘सुराज्य अभियाना’चे श्री. अभिषेक मुरुकटे उपस्थित होते.

परिवहन आयुक्तांच्या आदेशावर कारवाई होण्यासाठी 16 ठिकाणी निवेदने ! 

  हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियना’च्या अंतर्गत केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर प्रवाशांची आर्थिक लुटमार थांबावीयासाठी खाजगी ट्रॅव्हल्सच्या बुकींग सेंटरवर शासनमान्य तिकिटदर लावण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्तांनी 25 ऑगस्ट 2022 या दिवशी दिले होतेपरंतु राज्यातील बहुतांश ठिकाणी खाजगी ट्रॅव्हल्सच्या बुकींग सेंटरवर अद्यापही शासनमान्य तिकिटदर लावण्यात आलेले नाहीतयोग्य पद्धतीने या निर्णयाची अंमलबजावणी होत नाहीत्यामुळे राज्यातील जळगावपेणसाताराकराडअमरावतीसांगलीकोल्हापूरयवतमाळनागपूरसोलापूरपुणेपिंपरीचिंचवडठाणेकल्याणचंद्रपूर आणि अकोला अशा 16 ठिकाणी प्रादेशिकउपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना प्रत्यक्ष भेटून खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून होणारी लुटमार थांबवण्यासाठी निवेदने देण्यात आली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.