प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत बंदी असणारे प्लास्टिक विक्री करणाऱ्यावर आस्थापनांवर कारवाई : महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संयुक्त कारवाई : 5 आस्थापना 30 हजाराचा दंड

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने सांगलीत सिंगल न्यूज प्लास्टिकवर कारवाई केली जात आहे. आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज महापालिका आणि प्रदूषण मंडळाच्या संयुक्तिक पथकाने गणपती पेठ , वखारबाग तसेच शहरातील प्रमुख बाजारपेठेमध्ये अनेक आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये प्लॅस्टिक साहित्य , डिस्पोजल,  पत्रावळी विक्री करणाऱ्या दुकानांची पाहणीसुद्धा केली. यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगलीचे क्षेत्र अधिकारी रवी मातकर आणि महापालिकेच्या पथकाने केलेल्या तपासणीत पाच आस्थापनांमध्ये शासनाने बंदी घातलेले प्लास्टिक विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रत्येक आस्थापनेला प्रत्येकी 5000 रुपयाप्रमाणे 6 आस्थापनांकडून 30 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. तसेच त्यांच्याकडील बंदी असणारे अंदाजे 30 किलो सिंगल युज प्लास्टिक पथकाने जप्त केले. महापालिका आणि प्रदूषण मंडळाची बंदी असणाऱ्या प्लास्टिकवर आणि त्याचा साठा आणि विक्री करणाऱ्यावर कारवाई सुरूच राहणार असून प्लास्टिक साहित्य विक्री करणाऱ्या आस्थापनानी आपल्या आस्थापनामध्ये शासनाकडून बंदी असणारे प्लास्टिक विक्रीसाठी ठेवू नये.  अन्यथा अशा आस्थापनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा प्रदूषण मंडळ आणि महापालिका प्रशासनाने दिला आहे.  आजच्या कारवाईमध्ये वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर ,स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे प्रणील माने, राजू कांबळे , कोमल कुदळे,  अंजली कुदळे , पंकज गोंधळे, वैभव कुदळे, किशोर कांबळे, उत्कर्ष होवाळे यांच्यासह सहभाग घेतला होता.

*आज केलेली कारवाई*

आजच्या कारवाईत एमके प्लास्टिक, दुर्गा प्लास्टिक, मोना प्लास्टिक, आरती डिस्पोजल, आर आर विभुते, जी एम मेडिकल
आदी आस्थापना प्रत्येक 5 हजाराचा दंड करण्यात आला.

*प्लास्टिक बट्स आढळल्यास दंड*

अनेक मेडिकल मध्ये कान साफ करण्यासाठी बट्स विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत मात्र हे बट्स लाकडी असावेत मात्र अनेक ठिकाणी प्लास्टिक बट्स विक्री केले जात आहेत. त्यामुळे अशा प्लास्टिक कांडी असणारे बट्स विक्री करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. असेच प्लास्टिक बट्स पटेल चौकातील जी एम मेडिकलमध्ये आढळून आल्याने महापालिका आणि प्रदूषण मंडळाने या मेडिकलला 5 हजाराचा दंड केला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.