प्रतिष्ठा न्यूज

मालगाव येथे आम आदमी पार्टी कडून संत गाडगेबाबा जयंती ग्रामस्वच्छतेने साजरी

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : येथील  मालगावमध्ये संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधत ग्रामपंचायत मालगाव व आम आदमी पार्टी मिरज तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने सोसायटी हॉल, मालगाव येथे ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी यांचा स्वच्छता दूत म्हणून गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मालगाव मधील एस. एम. हायस्कुल येथील विद्यार्थी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि आम आदमी पार्टीचे पदाधिकारी मिळून मालगाव मध्ये ग्राम स्वच्छता अभियान कार्यक्रम घेतला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीस सामूहिक भारतीय संविधान प्रास्ताविक वाचुन कार्यक्रमास सुरुवात झाली. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन मालगाव सरपंच अनिता क्षीरसागर तसेच आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम मुल्ला,  अरिफ मुल्ला व इतर ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व एस. एम हायस्कुलचे शिक्षक यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आम आदमी पार्टी मिरज तालुका सदस्य व या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संदीप कांबळे  यांनी केले. मिरज तालुक्यातील मालगाव व सुभाषनगर येथील स्वच्छता कर्मचारी यांचा स्वच्छता दूत म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.यात मुकादम अमित मनोहर खांडेकर, मंगल रमेश कांबळे, मीराबाई बाबाजी भंडारे, सुनिता महिपाल भंडारे, बेबी बागल देवकुळे, हवाबाई अशोक भंडारे, सिंधुताई धनपाल धेंडे(सुभाषनगर),लक्ष्मी दत्तात्रय बनसोडे (सुभाषनगर), सुभाष लव्हाजी भंडारे, सुनिल गुणधर भंडारे, संजय महिपाल भंडारे व राजू अरुण खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
        सदर कार्यक्रमांस मा सदानंद कबाडगे (गुरुजी) मालगाव तंटामुक्ती अध्यक्ष, मा अजित बंडे (ग्रामपंचायत सदस्य, मालगाव) यांनी मार्गदर्शन करताना संत गाडगेबाबा यांचे जीवनकार्य आजही आपल्या समाजाला व देशाला स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्यासाठी अत्यंत मार्गदर्शक आहे. यासाठी कृतिशील प्रयोग म्हणजे आम आदमी पार्टी मिरज तालुका अंतर्गत घेतलेला स्वच्छता अभियान व स्वच्छता कर्मचारी सत्कार कार्यक्रम अत्यंत कौतकास्पद आहे असे उदगार यावेळी काढले.
      आम आदमी पार्टी कडून संभाजी मोरे (जिल्हा अध्यक्ष, आम आदमी रिक्षाचालक संघटना,सांगली ) तसेच अरिफ मुल्ला (उपाध्यक्ष, सां. मि. कु. शहर जिल्हा उपाध्यक्ष) व प्रमुख अतिथी म्हणून वसीम मुल्ला (सचिव, पश्चिम महाराष्ट्र ) यांनी सांगितले की आपले मालगाव स्वच्छ व सुंदर होण्यासाठी तसेच गावातील कोणत्याही प्रश्नासाठी आमचा पक्ष आपल्या गावासोबत कायम राहील अशी ग्वाही दिली.येणाऱ्या काळात मालगाव मध्ये विविध आरोग्य तपासणी शिबीरे, विविध रोजगार विषयक कार्यक्रम* तसेच गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वप्रकारे उपक्रम गावात घेतले जातील. यासाठी स्थानिक पातळीवर आपल्या सर्वांचे असेच सहकार्य मिळावे ही सदिच्छा व्यक्त केली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज मगदूम यांनी केले.   आभार आम आदमी पार्टी मिरज तालुका सदस्य व या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संतोष मगदूम यांनी मानले.
यानंतर मालगाव मधील प्राथमिक आरोग्य केद्र जवळील जागा व गावातील हायस्कुल समोरील जागा स्थानिक नागरिकांच्या मदतीने व सोबत शालेय विद्यार्थी तसेच पक्ष पदाधिकारी यांनी मिळून स्वच्छ केली व स्वच्छता अभियान यशस्वी केले.
सदर कार्यक्रमास आम आदमी पक्षामार्फत  वसीम मुल्ला (सचिव, पश्चिम महाराष्ट्र), मा अरिफ मुल्ला (सां. मि. कु. शहर जिल्हा उपाध्यक्ष), मा फय्याज सय्यद (सां. मि. कु. शहर जिल्हा संघटक),मा युवराज मगदूम (सांगली जिल्हा सोशल मीडिया समन्वयक), मा तौफिक हवालदार (युथ विंग, जिल्हा उपाध्यक्ष), मा निसार मुल्ला (युथ विंग जिल्हा सचिव),मा संभाजी मोरे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी रिक्षाचालक संघटना, सांगली),मा इम्रान पठाण(जिल्हा सचिव, आम आदमी रिक्षाचालक संघटना, सांगली), मा सतीश सौन्दडे(जिल्हा संघटक, आम आदमी रिक्षाचालक संघटना, सांगली), आम आदमी मिरज तालुका ग्रामीण मधील सदस्य मा संदीप कांबळे, मा संतोष मगदूम, कुपवाड मधील सां. मि. कु. शहर जिल्हा सदस्य मा राम कोकरे, मिरज शहरचे मा शिवाजी गायकवाड, मा रविंद्र बनसोडे, मा  रिहान सय्यद, सांगलीचे मा ख्वाजा जमादार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच मालगाव मधील एस एम हायस्कुलचे शिक्षिका  गीता माने आणि पुष्पा गोरे  उपस्थित होत्या.
तसेच मालगाव ग्रामपंचायत मधून सरपंच अनिता क्षीरसागर, ग्रामसेवक प्रतीक जगताप, ग्रामपंचायत सदस्य  जावेद मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य अजित बंडे व इतर ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.