प्रतिष्ठा न्यूज

कोल्हापूर रोडवरील जलवाहिनीची गळती थांबविली : दररोज 1 लाख लिटर पाणी जात होते वाया

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर रोडवरील राजर्षी शाहू महाराज चौकात गळती झालेली पाईप लाईन दुरुस्तीचे काम मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. यामुळे दररोज गळती मुळे वाया जाणारे लाखो लिटर पाणी वाचवण्यात पाणी पुरवठा विभागाला यश आले.
सांगलीच्या कोल्हापूर रोड कुस्ती आखड्या जवळील राजर्षी शाहू महाराज चौकात आकाशवाणी टाकीकडे जाणाऱ्या मुख्य जल वाहिणीमध्ये गळती होऊन पानी वाया जात होते. यामुळे आकाशवाणी येथील पाण्याची टाकी भरण्यासाठी अधिक वेळ लागत होता. याचबरोबर पाणी गळती असल्याने दररोज अंदाजे 1 लाख लिटर पाणी वाया जात होते. याबाबत पाणी पुरवठा अभियंता अण्णासाहेब कुरणे यानी सदर कामाची पाहणी करीत तेथील गळती दूर करण्याबाबत तातडीने पाऊले उचलली. सोमवारपासून गळती काढण्याच्या कामाला सुरू झाली असून गुरुवार पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. या कामामुळे दररोज वाया जात असलेले 1 लाख लिटर पाणी वाचवण्यात पाणी पुरवठा विभागाला यश आले आहे. पाणी गळती काढल्यामुळे आता आकाशवाणी पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होणार असून वेळही वाचणार आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग चिदानंद कुरणे यानी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.