प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा १५ वर्षाखालील मुलांमुलीच्या स्वतंत्र निवड बुध्दिबळ स्पर्धेला सांगली येथे सुरूवात

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : सांगली डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या  मान्यतेने केपीएस चेस अँकँडमीच्या वतीने दैनिक लोकमत यांच्या सहकार्याने सांगली जिल्हा १५ वर्षाखालील मुलांमुलीच्या स्वतंत्र निवड बुध्दिबळ स्पर्धेला वारणा मंगल कार्यालय मार्केट यार्ड, सांगली येथे घेण्यात आल्या.
या स्पर्धेचे उद्घाटन लक्ष्मीनारायण केटरर्सचे सत्यजित सावंत व  सांगली जिल्हा बुध्दिबळ असो. चे सचिव  चंद्रकांत वळवडे यांच्याहस्ते पटावरील चाल खेळून करण्यात आले. यावेळी विक्रम हसबनीस , रविंद्र बिरजे उपस्थित होते. प्रास्ताविक, परिचय विजयकुमार माने यांनी केले.  आभार पौर्णिमा उपळावीकर- माने  यांनी केले.
या स्पर्धेला सांगली जिल्हयातील सांगली, मिरज, इस्लामपूर, तासगांव, कामेरी  आदि शहरातील १५ वर्षाखालील मुलांच्या गटात १०७ मुले , २४ मुली खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये  हदीन महात, कश्यप खाकंरीया,आदित्य कोळी,  हर्ष शेट्टी , गुरूराज धोंगडे,अव्दिक फडके , गुरूराज धोंगडे या मानांकित खेळाडूसह शार्विल येडेकर, आदित्य चव्हाण,स्मित मोठे या नामांकिताचा सहभाग होता.
          चौथ्या फेरीअखेर कश्यप खाकंरीया , हदीन महात, हर्ष शेट्टी , गुरूराज धोंगडे , आदित्य कोळी, अजिंक्य आडके , शार्विल येडेकर ४ गुणासह संयुक्त प्रथम स्थानावर  तर प्रज्वल राय ३.५ गुणासह व्दितीय स्थानावर आहेत. हर्ष बावडेकर, अथर्व भांडारकर, अर्चित चौगुले, अव्दिक फडके ,आल्हाद सोहनी, कपिल जहागिरदार ५ गुणासह संयुक्त तिस-या स्थानावर आहेत.
चौथ्या फेरीअखेर गुण – १) कश्यप खाकंरीया- ४  , २)हदीन महात – ४,  ३)हर्ष शेट्टी -४, ४)गुरूराज धोंगडे -४, ५)आदित्य कोळी -४,  ६)अजिंक्य आडके-४ ,
७) शार्विल येडेकर – ४
मुलीच्या गटात जिया महात, अनुजा कोळी या मानांकितासह स्नेहा निकम,अविरा फडके , अंकिता नरळे, आराध्या निंबाळकर या नामांकितासह २४
खेळाडू सहभागी झाले होते.
        चौथ्या फेरीअखेर जिया महात , स्नेहा निकम ४ गुणासह प्रथम स्थानावर,अनुजा कोळी,स्वरा बावडेकर,रंक्षू कुलकर्णी ,अंकिता नरळे ३ गुणासह व्दितीय स्थानावर आहेत.
चौथ्या फेरीअखेर गुण – १) जिया महात- ४ , २) स्नेहा निकम – ४
         या स्पर्धेचे पंच म्हणून  काम फिडे पंच पौर्णिमा उपळावीकर, सदानंद चोथे, रोहित पोळ, विजयकुमार माने दिपक वायचळ यांनी पाहिले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.