प्रतिष्ठा न्यूज

कुपवाड ड्रेनेजचे काम करताना खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त करा: आमदार सुधीर गाडगीळ; कुपवाड, अहिल्यानगर, गव्हर्मेंट कॉलनीत पाहणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली महानगरपालिका क्षेत्रात ड्रेनेजच्या कामामुळे ज्या ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत ते तातडीने दुरुस्त करा. खराब रस्त्यांमुळे नागरिकांची गैरसोय होता कामा नये, असे निर्देश आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिले.
कुपवाड, अहिल्यानगर आणि गव्हर्नमेंट कॉलनीमधील परिसरात सध्या ड्रेनेज योजनेचे काम सुरू आहे. ड्रेनेजचे काम सुरू असतानाच अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जा -ये करताना नागरिकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात आमदार गाडगीळ यांनी त्या परिसरात जाऊन पाहणी केली. तेथील नागरिकांशी चर्चा केली. ड्रेनेजचे काम तूर्तास बंद करून रस्ते दुरुस्तीकडे लक्ष द्या. रस्त्यांचे मुरमीकरण, खडीकरण व डांबरीकरण करून तो रस्ता तातडीने दुरुस्त करावा व पावसाळा झाल्यानंतर त्या भागातील उर्वरित ड्रेनेजचे काम सुरू करावे असे आदेश संबंधित ठेकेदार व महापालिकेचे अधिकारी यांना दिले. नागरिकांची गैरसोय होणार नाही याबाबत महापालिका प्रशासनाने दक्षता घ्यावी असेही आमदार गाडगीळ यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना सांगितले. महापालिका क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी असे रस्ते खराब झाले आहेत त्यांची युद्ध पातळीवर दुरुस्ती करा असेही निर्देश त्यांनी दिले.
यावेळी माजी नगरसेवक विनायक सिंहासने, माजी उपमहापौर मोहन जाधव, विश्वजित पाटील, रविंद्र सदामते, सुभाष गडदे, शशिकांत टेके, मनपा ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता कुरणे, उपअभियंता एस.डी. चौगुले, एम. एन.पाटील, डी.डी. पवार, मिलिंद पाटील, ड्रेनेज विभागाचे जयंती सुपर कंपनीचे ठेकेदार रवी केथलिया तसेच आदी भागातील नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.