प्रतिष्ठा न्यूज

तासगाव सांगली रस्त्यावर खड्डेच खड्डे : बांधकाम विभाग कोमात खड्डे जोमात

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव पासून कवठे एकंद कुमठा फाटीपर्यंत अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर सुमारे शंभरएक लहान मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे या प्रमुख मार्गावरील दुचाकी वाहकांना मोठी कसरत करावी लागत आहे.यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.नव्याने डांबरीकरण होवूनही या मार्गांवर खड्डे पडल्याने दुचाकी, चारचाकी वाहन धारकांना गाड्या चालवताना कसरत करावी लागत आहे.तासगावला जाताना व येताना दोन्ही बाजूला प्रामुख्याने दुचाकी चालविण्याच्या मार्गात जागोजागी खड्डे पडले आहेत.खड्डे चुकविण्यासाठी वाहकांना कसरत करावी लागते परंतु मागून येणाऱ्या चार चाकी किंवा भरधाव वाहन चालवणाराची धांदल उडते.गेल्या काही दिवसात खड्डा चुकविण्यासाठी मागून येणाऱ्या वाहनांच्या आडवे जावून लहान मोठे अपघात झाले आहेत.
परिसरात कोल्ड स्टोअरेज व अन्य व्यवसाय असल्याने चार चाकी वाहनांची वर्दळ अधिक असते.सकाळ सत्रात कामगार व शाळा, कॉलेजचे विद्यार्थी याची दुचाकीवरून वर्दळही अधिक असते.खड्डेमय रस्तामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या तुन करण्यात येत आहे.
*अपघातात वाढ*
जागोजागी खड्डे असल्याने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना अधिक अपघातांना सामोरे जावे लागत आहे.रस्त्यावर नव्याने आलेल्या वाहकांची अचानक येणाऱ्या खड्डयामुळे फजितीच होते.काही ठिकाणी एक फूटाचे खोल खड्डे आहेत.त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.खराब रस्त्यावरून जाताना हादर्यामुळे महिला गाडीवरून पडल्याने जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत.त्यामुळे परिसरात वाहतूक असुरक्षित बनली आहे.

बांधकाम विभागाची गांधारीची भूमिका
सांगली रस्त्यावर तासगाव पासून कवठे एकंद कुमठा फाटी पर्यंत परिसरात नेहमीच खड्डेमय रस्ता अशी जणू ओळखच बनली आहे,त्यातच आता तासगावला जाताना ही त्यांची प्रचिती बांधकाम विभागाच्या डोळस कारभारामुळे येताना दिसते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.