प्रतिष्ठा न्यूज

मेहनत करा,यश निश्चित मिळेल.. तासगावच्या वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात युवा संवाद मेळाव्यातुन नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा,मोठे ध्येय ठेवून चांगले अधिकारी व्हावे,विद्यार्थ्यांनी चांगल्या मित्रांची संगत करावी,चांगल्या लोकांच्या संपर्कात रहावून चांगले अधिकारी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा,मेहनत करा,यश निश्चित मिळेल,असे प्रतिपादन तासगावच्या निवासी नायब तहसीलदार धनश्री स्वामी यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे केले.तहसील कार्यालय,शिक्षण विभाग पंचायत समिती आणि महाविद्यालयातील सैन्य व पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल पंधरवडा २०२४ अंतर्गत आयोजित केलेल्या युवा संवाद मेळावा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर त्या बोलत होत्या.यावेळी गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना कोणती काळजी घ्यावी हे सांगून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी कष्ट करण्याचे आवाहन केले.मी कोण आहे आणि मला काय व्हायचे आहे, याचा ध्यास ठेवून मार्गक्रमण करा, युवकांमध्ये संवादाची गरज असल्याचे त्यांनी विविध उदाहरणांच्या
माध्यमातून सांगितले.यावेळी सब रजिस्टर उमाकांत लिमसडे यांनी महसूल विभागाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्युनिअर विभाग प्रमुख एस.डी.पाटील यांनी केले तर आभार प्रा.एफ.बी.वलांडकर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला विस्तार अधिकारी रामचंद्र राठोड,डॉ.साईनाथ घोगरे यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक,प्रशासकीय सेवक वर्ग,विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.