प्रतिष्ठा न्यूज

देगलूर येथे किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडोमारो आंदोलन करून दहन

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
नांदेड : तालुका देगलूर येथील अण्णा भाऊ साठे चौकात आज दि.18 जुलै 2023 रोज मंगळवारी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांची अश्लील चाळे करणारी क्लिप व्हायलर झाल्याच्या निषेधार्थ सोमय्या यांच्या प्रतिमेला भर पावसात जोडोमारो आंदोलन करुन प्रतिमेला दहन करण्यात आले, व या सेक्स स्कॅन्डलची चौकशी करून कारवाई करुन अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख- महेश पाटील अल्लापुकर, तालुका प्रमुख- बालाजी पाटील इंगळे खुतमापुरकर, संघटक- राजेंद्र इंगळे खानापूरकर, नागनाथ वाडेकर, बालाजी मैलागिरे, आदीसह शिवसेना, युवासेना, यांचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.