प्रतिष्ठा न्यूज

अभिनव बालक मंदिर ‘चा क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे 
सांगली : येथील स्वा. सावरकर प्रतिष्ठान संचालित, अभिनव बालक मंदिर चा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. समारंभाचे प्रमुख पाहुणे मनोविकास समुपदेशक डॉ. कपिल लळीत तर अध्यक्षा वंदना व संजय सवदत्ती दांपत्य होते.यावेळी बोलताना डॉ. कपिल लळीत म्हणाले की,  उत्तम भविष्यासाठी कसोटीच्या काळात संयम राखणे हे कौशल्य आहे ते अंगी बाळगले पाहिजे. पालकांनीही आजच्या विद्यार्थ्याच्या कुतूहलास मार्गदर्शनाची जोड देऊन त्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मनोगत व्यक्त करताना सवदत्ती म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अपयश हे आव्हान म्हणून स्वीकारले पाहिजे. शिक्षणासोबत संस्कारही जपले पाहिजेत.आठ दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवात,  कबड्डी, खो-खो, रिले, लांब उडी, दोरी उडी, डॉज बॉल, गोळा फेक अशा अनेक क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले. मुलांमध्ये विंध्य गट तर मुलींमध्ये गंगा गट विजेते ठरले.
     यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार नामजोशी, उपाध्यक्ष नंदकुमार जोग, कार्यवाह भास्कर कुलकर्णी, मुख्याध्यापक महादेव कुंभार, प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेचे मुख्याध्यापक सुबोध कुलकर्णी, आदर्श शिशु विहारच्या मुख्याध्यापिका मंजिरी लिमये उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीना जोशी यांनी तर आभार नानासाहेब राजमाने यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.