प्रतिष्ठा न्यूज

छत्रपती शिवसंभु प्रतिष्ठान व स्वामी समर्थ मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने रोगनिदान व रक्तदान शिबीर संपन्न

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :- रक्तदान हेच श्रेष्ठ दान – रक्तदान हेच पवित्र दान “रक्तदान करूया, एक पुण्यकर्म करूया वेळेची गरज आणि सामाजिक भान लक्ष्यात घेऊन स्क्तदान करूया” या दानातून अनेकांचे प्राण आपण वाचवू शकतो, करोना काळात रक्तदान आणि ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना समजले आहे. म्हणूनच राष्ट्रीय उत्सव, समाजसेवी संस्था, गाव पातळीवर साजरे करण्यात येणारे सन यावेळी सुद्धा रक्तदान शिबिरे घेतली जातात. ज्यांनी रक्तदान केले त्यांचे हे रक्तदान समाजासाठी फार उपयोगी पडते हे लक्षात घेतले पाहिजे.
नांदेड तालुक्यातील गुंडेगाव येथील छत्रपती शिवसंभु प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ मंदिर, मालेगाव रोड, तरोडा खु. यांच्या विद्यमाने दत्त जयंती निमित्त भव्य रोगनिदान व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा – निर्मलाताई हंबर्डे, सचिव- दिपक हंबर्डे, सदस्य- मंगेश देवकांबळे, श्री स्वामी समर्थ मंदीराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, डॉ.सोनल गांधी, तसेच भगवान पाटील, पतंगे सर, राजेश इभुते, पद‌मावती मुपडे, स्नेहा मठपती, मंजुषा पालदेवार, वर्षा मुखेडकर, सखाराम सुने, कविता रायलवार, सागर नेरलकर, महेश चौधरी, सरोजनी पाटील, आरती वाघमारे, मिराताई तेलंग, मनीषा पत्तेवार, आदींची उपस्थिती होती. या रक्तदान शिबीरासाठी अर्पण ब्लड बँक यांनी मोठे सहकार्य केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.