प्रतिष्ठा न्यूज

अदानी उद्योग समूहात सरकारी वित्तीय संस्थांनी केलेल्या गुंतवणुकीची चौकशी करा : अजित ढोले; काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : अदानी उद्योग समूहात सरकारी वित्तीय संस्थांनी केलेल्या गुंतवणुकीची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस सेवा दलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष अजित ढोले यांनी केली. जिल्हाधिकारी यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.
सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दल व काँग्रेस पक्षातील इतर संघटनेच्या वतीने आज महामहीम राष्ट्रपती भारत सरकार यांना अदानी उद्योग समूहामध्ये एलआयसी स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सरकारी वित्तीय संस्थांनी केलेल्या गुंतवणुकी संदर्भात संयुक्त संसदीय समिती जीपीसी मार्फत चौकशी होणे बाबत निवेदन देण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुभाष तात्या खोत, ॲड. भाऊसाहेब पवार, बापूसाहेब चौधरी, पैगंबर शेख, ओबीसी संघटनेचे अशोक रजपूत, मौलाली वंटमोरे, लालसा तांबोळी, विठ्ठलराव काळे, विश्वासराव यादव, अरुण पळसुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.