प्रतिष्ठा न्यूज

येळावीत विकासकामांबाबत ग्रामपंचायत उदासीन : नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या येळावी गावातील नागरिकांना सध्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.येळावी गावची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ग्रामपंचायतिचे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होताना दिसून येतं आहे.गावातील अनेक भागांत रस्ते,स्टेटलाईट,पाणी या मूलभूत गरजांचा अभाव आहे.गावातील खराडे वस्तीवर जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.जुना धनगाव रोडवर स्टेटलाईट चीं सोय नसल्याने रात्रीचा प्रवास करताना नागरिकांना अडचणी येतं आहेत,तसेच गावात सार्वजनिक शौचालय नसल्याने नागरिकांचीं गैर सोय होतं असून गावात शौचालय उभे करावेत या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादीचें उपाध्यक्ष रोहित पाटील यांनी ग्रामपंचायतिला निवेदन देऊन हे प्रश्न सोडवण्याची विनंती केली आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य उमेश पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या आंधळ्या कारभारावर आक्षेप घेत  येळावी ग्रामपंचायतीचे सत्ताधारी ज्या तुंबलेल्या गटारींचे फोटो टाकुन सत्तेत आले आहेत,त्यांच्याच काळात गटार सफाई वर बेमाफ खर्च करूनही मेन चौकातील गटारीचे तुंबलेले पाणी रस्त्यावर आले आहे त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ग्रामपंचायती ने तात्काळ दखल घेऊन ज्या कंत्रादारांकडून हे काम करण्यात आले आहे त्याला जाब विचारून नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.