प्रतिष्ठा न्यूज

अमोल बोंगार्डे यास ५७ किलो वजनी गटात ब्राँझ

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : चंदिगड विद्यापीठ येथे सुरू असलेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी रेसलिंग स्पर्धेमध्ये डॉ.ग. गो.जाधव महाविद्यालयाच्या अमोल बोगार्डे यांने ५७ किलो वजनी गटांमध्ये ब्राँझ पदकाची कमाई करत ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेत शिवाजी विद्यापीठास पदक मिळवून दिले.
यापूर्वी त्याने साऊथ झोन स्पर्धेत सुवर्णपदक. मागील महिन्यात धाराशिव येथे झालेल्या स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात महाराष्ट्र केसरी किताब, तर गोवा येथे झालेल्या नॅशनल गेम्स मध्ये रौप्य पदक पटकावले आहे.
या करिता त्याला संस्थेचे अध्यक्ष व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सतीश देसाई व सचिव डॉ. विद्या देसाई , प्र.प्राचार्य डॉ.एस.एस. पानारी यांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.