प्रतिष्ठा न्यूज

लोणंद येथे गोल्ड व्हॅल्यूवर प्रशिक्षण सुरु !

प्रतिष्ठा न्यूज
लोणंद प्रतिनिधी : भारतीय स्वर्णकार संघ व सूक्ष्म लघु उद्योग मंत्रालय (एम. एस. एम. ई.) टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सेंटर यांच्यावतीने लोणंद ता. खंडाळा जिल्हा सातारा येथे गोल्ड व्हॅल्युवर प्रशिक्षण उत्साहात पार पडले.
शिबिराचे उद्घाटन मार्गदर्शिका सोमिता सेलव्हकुमार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. त्यावेळी संदीप हाडगे, मनिष सहदेव , कृष्णा खलबलीया, राजेशजी थडवे, मनोज मोसून,दीपक सोलिवाल, देवीलालजी सोनी , रवींद्र दीक्षित, कुणाल नामुजवार, मिलिंद पवार,ध्वज महामुनी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशिक्षणा दरम्यान सोने, चांदी, प्लॅटिनियम अशा मौल्यवान धातूंची तपासणी, कॅरेट प्रत, घनता,गुणधर्म याबद्दलची माहिती तसेच मौल्यवान धातू बद्दलचे कायदेशीर बाबींची माहिती देण्यात आली.

प्रशिक्षणा दरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 115शिबिरात त्यांनी सहभाग घेतला. सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण यशस्वी केल्याबद्दल केंद्र शासनाच्या वतीने प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.