प्रतिष्ठा न्यूज

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाची शैक्षणिक सहलीने दिली नायगांव येथील “वसंत ऊती संवर्धन लॅब” ला भेट

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : तालुका धर्माबाद येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील बीएससी द्वितीय वर्षात शिकत असलेल्या वनस्पती शास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नायगाव (बाजार) येथील कृषीतंत्र महाविद्यालयाने वातानुकूलित तयार केलेल्या “वसंत ऊती संवर्धन टिशू कल्चर लॅब” ला भेट दिली असून यावेळी “वसंत टिशू कल्चर लॅबचे” समन्वयक प्रा.ए. एस.भालेराव यांनी विद्यार्थ्यांना ऊती संवर्धन टिशू कल्चर लॅब मध्ये विविध वनस्पतीसह केळी आणि बांबू या वनस्पतीचे ऊती संवर्धन कसे होते.या बाबतची सविस्तर माहिती विद्यार्थ्याना दिली.
या शैक्षणिक सहलीचे शिस्तबद्ध नियोजन महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका- प्रसन्नाराणी तन्नीरु यानी केले होते. या शैक्षणिक सहलीसाठी वनस्पती शास्त्र विभागाच्या प्राध्यापिका- स्नेहलता रामोड आणि प्रायोगशाळा कर्मचारी- संतोष मुलकोड यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्राध्यापिका- प्रसन्नाराणी यांनी नायगांव येथील कृषीतंत्र महाविद्यालयाच्या “वसंत टिशू कल्चर लॅब”ने आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल येथील प्रशासनाचे आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.