प्रतिष्ठा न्यूज

मोदीजींच्या नेतृत्वात सरकारने नऊ वर्षात महिलांसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या सौ.ज्योतीकाकी पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेमध्ये दिलेले 33% आरक्षणाचा निर्णय घेतल्यामुळे देशातील समस्त महिलांना सोनेरी दिवस येतील हा निर्णय म्हणजे एक सोनेरी क्षण असल्याचे मत सौ. ज्योतीताई संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले,या आरक्षणाच्या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी त्यांचे आभार मानले.
चिंचणी येथे गौरी- गणपती निमित्ताने खासदार संजयकाका पाटील यांच्या निवासस्थानी सांगली जिल्ह्यातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला होता.यावेळी सौ ज्योतीताई पाटील बोलत होत्या त्या म्हणाल्या केंद्रातील पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या नऊ वर्षांमध्ये महिलांसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत,त्यात प्रामुख्याने उज्वला गॅस योजना याचा विशेष उल्लेख करावा लागेल या योजनेमुळे गोरगरीब कुटुंबातील महिलांना मोठा आधार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तसेच आगामी काळात देशातील 75 लाख कुटुंबाला उज्वला गॅस योजनेतून आणखी लाभ देण्यात येणार आहे. आयुष्यमान भारत या योजनेमुळे आरोग्य व पंतप्रधान आवास योजना या योजनेमुळे कोट्यावधी कुटुंबांतील महिलांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडला आहे,आता नुकताच घेतलेल्या महिला आरक्षणाच्या निर्णयामुळे महिलांच्या जीवनामध्ये या क्रांतिकारी निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे महिला आरक्षण मिळाल्यामुळे सर्व स्तरात प्रगती करणाऱ्या महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हळदी कुंकू कार्यक्रम सौ.ज्योतिकाकी संजयकाका पाटील, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेचे प्रमुख प्रभाकरबाबा पाटील यांच्या पत्नी सौ.शिवानी प्रभाकर पाटील यांच्या संकल्पनेतून प्रथेप्रमाणे घेण्यात आला होता.या कार्यक्रमाला तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.सर्व उपस्थित महिलांचे हळदीकुंकू सौ.ज्योतीकाकी संजयकाका पाटील व डॉ.सौ.शिवानी पाटील यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.