प्रतिष्ठा न्यूज

विनापरवाना वाहतुक होत असलेले ४१ कि. ५५७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने जप्त

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : विनापरवाना वाहतुक होत असलेले २५,९२,११४/- रुपये किंमतीचे ४१ कि. ५५७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने जप्त करण्यात आले. सांगली शहर पोलीस ठाणे व निवडणुक पथकाने संयुक्त ही कामगीरी केली.
घटनेची हकीकत –सदर घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, आगामी लोकसभा निवडणुकी-२०२४ अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असुन दिनांक १२.०४.२०२४ रोजीचे १२.०० वा.चे. सुमारास सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील सांगलीवाडी टोलनाका येथे निवडणुक पथकातील पोलीस अंमलदार पोलीस नाईक /१९८० निशांत मागाडे व पोकों/२५७१ संदिप नागरगोजे हे निवडणुक पथकाचे प्रमुख निखील सर्जेराव म्हांगोर व कर्मचारी शंकर कुलैया भंडारी, ३) प्रमोद अर्जुन भिसे असे नाकाबंदी करीत असताना मारुती सुझुकी स्विफ्ट चारचाकी वाहन क्रमांक एमएच-१०-सी.ए.-८६३० मधुन इसम नामे देवेंद्र बाबुलाल माळी वय-२० वर्षे रा. शिराळकर कॉलनी आष्टा ता. वाळवा जि. सांगली हे विनापरवाना चांदीचे दागीन्यांची वाहतुक करीत असताना मिळुन आलेने सांगली शहर पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण व पोलीस स्टाफने त्याठिकाणी जावून मिळुन आलेल्या वाहनाची दोन पंचांसमक्ष झडती घेवुन आचारसंहिता कालावधीमध्ये विनापरवाना वाहतुक होत असलेले २५,९२,११४/- रुपये किंमतीचे ४१ कि. ५५७ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने मिळुन आलेने ते सविस्तर पंचनाम्याने जप्त केले आहेत. वरीलप्रमाणे मिळून आलेल्या दागीन्यांबाबत मा. भारत निवडणुक आयोगाने सांगली जिल्ह्यामध्ये स्थापन केलेल्या विशेषाधिकार समितीकडे तसेच मा. आयकर अधिकारी व सेवा व वस्तुकर अधिकारी सांगली यांचे कार्यालयात अहवाल अहवाल सादर करुन पुढील कारवाई करणेची तजविज ठेवली आहे.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. वरीष्ठ पोलीस अधीक्षक श्री संदिप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अण्णासाहेब जाधव, याचे मार्गदर्शानाखाली

श्री संजय मोरे, पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार सांगली शहर पोलीस ठाणेकडील

१) पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण, २) पोहेकॉ/७६९ अजय माने, ३) पोलीस नाईक /१९८० निशांत मागाडे, ४) पोना/७२० महेश मुळीक, ४) पोना/७०० धनाजी मोरे, ५) पोना/२०८२ अविनाश सागर ६) पोकों/२५७१ संदिप नागरगोजे
निवडणुक पथकातील १) निखील सर्जेराव म्हांगोरे, २) शंकर कुलैया भंडारी, ३) प्रमोद अर्जुन भिसे

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.