प्रतिष्ठा न्यूज

मराठा समाजातील दैदिप्यमान यश प्राप्त करणाऱ्या प्रज्ञा प्रतिभावंतांचा 25 जून रोजी गौरव सोहळा

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : जिल्ह्यातील मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व 33 कक्षाच्या वतीने मराठा समाजातील दैदिप्यमान यश प्राप्त करणाऱ्या प्रज्ञा प्रतिभावंतांचा गौरव सोहळा दि.25 जुन 2023 रोजी किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील छत्रपती संभाजीराजे मराठा विद्यार्थी वसतिगृह येथे सकाळी 10: 30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
किनवट तालुक्यातील इयत्ता 10 वी,12 वी, मेडिकल, इंजिनियरींग, कला, क्रीडा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण तसेच विशेष प्राविण्य मिळालेले विधार्थी, विविध पदावर गेलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी दि.22 जून 2023 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, व 33 कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
नुकतीच किनवट येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व सर्व कक्षांची बैठक पार पडली.
यावेळी मराठा सेवा संघाचे- प्रा.जयवंत चव्हाण, राजू शिंदे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष- प्रा.दगडू भरकड, प्रा.शिवदास बोकडे , जनार्धन काकडे, राजेश कदम, प्रा.संतोष चव्हाण, श्याम फाळके, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख- बालाजी सिरसाट तालुकाध्यक्ष- सचिन कदम, पांडुरंग बादड यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.