प्रतिष्ठा न्यूज

सांगली शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजनांबाबत शहर पोलिस ठाण्याच्या वतीने व्यापाऱ्यांशी संवाद बैठक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे कामी तसेच व्यापारी पेठेच्या सुरक्षिततेबाबत सांगली शहर पोलीस ठाण्याच्या वतीने व्यापारी मित्र संवादाचे आयोजन गणपती पेठ येथे करण्यात आले
सांगली शहरातील मागील काही महिन्यातील दरोडा चोरी मारामारी या वाढत्या घटनांमुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या मध्ये भीती व असुरक्षितता निर्माण झाली होती त्या अनुषंगाने शहर पोलीस उपाधीक्षकांना आण्णासाहेब जाधव ,सांगली शहर पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी पेठेमध्ये गणवेश धारी पोलिसांचे गस्त दिवस रात्र ठेवावे तसेच बाजारपेठे मधील बंद अवस्थेतील सीसीटीव्ही चालू करावेत, शहर पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस चौकी कार्यरत असाव्यात त्याचप्रमाणे शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवून पार्किंगची व्यवस्था करावी. अशा विविध सूचना देण्यात आल्या यावर बोलताना माजी नगरसेवक शेखर माने म्हणाले पोलिसांच्या हातातील लाठी गायब झाली असून त्याऐवजी मोबाईल आला आहे पोलिसांच्या हाती लाठी असेल तर गुन्हेगारांवर वचक बसतो.
व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या सूचनांना उत्तर देताना डीवायएसपी जाधव यांनी व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी भयभीत न होता पोलीस स्टेशन संपर्क साधावा याची दखल तातडीने घेण्यात येईल व यापुढे गुन्हेगारांची गय केली जाणार नाही असे अश्वस्थ केले.
तसेच यावेळी शहर पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख व वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी सुद्धा व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांचे निरसन केले.
सदर बैठकीच गणपती पेठ व्यापारी असोसिएशन रमेश शहा भरत गिडवाणी , बाळासाहेब खेराडकर, भास्कर विभूते, हरीश लालन, शामसुंदर पारिख, अजित किल्लेदार, पापालाल सारडा गणेश कोडते , राहुल कापशीकर सह गणपती पेठ व्यापारी असोसिएशन कापड पेठ असोसिएशन मेन रोड असोसिएशन रेडिमेड गारमेंट असोसिएशन मारुती असोसिएशन इत्यादी संघटनेचे व्यापारी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.